अहमदनगर: सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे, संघटनेच्या वतीने लोकांची केलेली कामे, सरकारच्या माध्यमातून लोकांचे मार्गी लावण्यात आलेले प्रश्न यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेसतर्फे "मी " अभियान सुरू करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या संकल्पनेतून नगर शहरात ही योजना सुरू करण्यात येत आहे. प्रचाराच्या बाबतीत भाजपची यंत्रणा सर्वांत मोठी असल्याचे बोलले जाते, त्यांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसने हे पाऊल उचलल्याचे दिसून येते. वाचा: पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी हे अभियान राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर शहरामध्ये शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या अभियानाची अंमलबजावणी करण्यास सुरवात झाली. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आली. काळे यांनी सांगितले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने 'मी गांधी दूत' या अभियानामध्ये गांधी दूत होण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह काँग्रेस विचारावर प्रेम असणाऱ्या नागरिकांना यासाठी देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन आपले नाव नोंदविता येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून नगरमध्ये पहिल्या टप्प्यात ३०० सोशल मीडिया वॉरियर्सची टीम उभी करण्यात येईल. या वॉरीयर्सना राज्य तसेच ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वतीने वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानंतर हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dkaZjw
No comments:
Post a Comment