Breaking

Tuesday, March 30, 2021

अफेअरच्या चर्चेत अर्सलाननं सुझानच्या मुलाला केलं बर्थडे विश https://ift.tt/3fn65VH

मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनची एक्स वाइफ मागच्या काही दिवसांपासून तिच्या अफेअर्सच्या वृत्तांमुळे चर्चेत आहे. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर हृतिक आणि सुझाननं घटस्फोट घेतला होता. अर्थात हे दोघं का वेगळे झाले याचं कारण कधीच समोर आलं नाही. पण आपल्या मुलांसाठी दोघंही नेहमीच एकत्र दिसतात. काही दिवसांपूर्वी हृतिक आणि सुझानचा मुलगा रेहानच्या बर्थडे पार्टीला सुद्धा संपूर्ण कुटुंब एकत्र दिसलं. पण सुझान खानच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर तेव्हा जास्त होऊ लागली जेव्हा अर्सलान गोनीनं सुझान-हृतिकच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सुझान खाननं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रेहानच्या १५ व्या वाढदिवसाला एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अनेक फोटोंचं कोलाज होतं. ज्यात रेहान आपल्या फॅमिलीसोबत केक कट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सुझाननं आपल्या मुलासाठी एक सुंदर कॅप्शन दिलं होतं. 'माझं आयुष्य, माझ्या जीवनातील आशेचा किरण, तू माझ्यासाठी सर्वकाही आहे. माझ्या हसण्याचं कारण तू आहेस.' सुझाननं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी रेहानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यात अर्सलान गोनीचा सुद्धा समावेश आहे. सुझानच्या व्हिडीओवर कमेंट करत अर्सलाननं रेहानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आता पुन्हा एकदा सुझान आणि अर्सलानच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. मागच्या बऱ्याच काळापासून या दोघांच्या सोशल मीडिया पोस्ट पाहता हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला होता. अर्सलानची कमेंट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आणि काही दिवसांपूर्वीच करिओग्राफर शबीना खानच्या पार्टीमध्ये एकत्र दिसले होते. ज्यात अली गोनी आणि त्याची गर्लफ्रेंड जास्मिन भसीन सुद्धा सहभागी झाले होते. २०१७ मध्ये अर्सलाननं जिया आणि जिया या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. ज्यात तो अभिनेत्री ऋचा चढ्ढा आणि कल्कि कोचलिनसोबत दिसला होता. मागच्या काही काळापासून सुझान खानसोबत अफेअरच्या चर्चांमुळे तो चर्चेत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3wbbZPD

No comments:

Post a Comment