नागपूर: करोनावर मेडिकलमध्ये (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय) उपचार घेत असलेल्या एका वृद्धाने सोमवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मेडिकलच्या बेसमेंटमध्ये मागच्याच आठवड्यात सुरू झालेल्या वार्डात हा प्रकार घडला आहे. (81 year old corona patient hangs self in Nagpur Hospital) ट्रामा सेंटरमध्ये कोविड रुग्णांना दाखल करण्याची सुविधा आहे. गेल्या काही दिवसात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेकांना परत पाठविण्यात येत होते. जास्तीत जास्त रुग्णांना दाखल करून घेता यावे म्हणून ट्रामा केअर सेंटरच्या बेसमेंटचा उपयोग करून घेण्याचे ठरले व मागच्या आठवड्यात तेथे ९० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. आधीच कोविड सेंटर व त्यातही बेसमेंटमध्ये त्यामुळे येथे वर्दळ फारच कमी असते. तेथे गेल्या ४ दिवसांपासून गजभिये यांच्यावर उपचार सुरू होते. या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना येण्याची परवानगी नसल्याने त्यांच्यासोबत कोण होते व त्यांना येथे कोणी दाखल केले याचा शोध पोलीस घेत आहेत. मेडिकलच्या कागदपत्रात त्यांचा पत्ता रामबाग असा देण्यात आला आहे. रामबाग हा या हॉस्पिटलला लागून असलेलाच भाग आहे. वाचा: सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांनी गळफास घेतला असावा असा अंदाज आहे. तेथील सफाई कर्मचारी बाथरुममध्ये गेला असता गजभिये यांनी ऑक्सिजन मास्कच्या वायरनेच गळफास लावल्याचे आढळून आले. वायरचा एक भाग त्यांनी तेथील एक्झॉस्ट पंख्याला बांधला होता. सफाई कर्मचाऱ्याने मेडिकल प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर लगेच अजनी पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आली. रुग्णाला कोणी आणले, त्याचे नातेवाईक कोण, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाचा: गजभिये यांना २६ मार्च रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून कळू शकले नाही. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. घटनास्थळावर 'सुसाइड नोट' आढळलेली नाही. अजनी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू दुसरीकडे, औरंगाबदच्या जिल्हा रुग्णालयात एका बाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाला आहे. गुलाबराव ढवळे असं त्याचं नाव असून हा रुग्ण तब्बल साडेचार तास ऑक्सिजन विना शौचालयात पडून होता. रुग्णालयाच्या प्रशासनाच्या बेफिकीरीमुळं ढवळे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mbS7r6
No comments:
Post a Comment