: नागपूर ग्रामीणमध्ये एकापाठोपाठ घडलेल्या चार हत्याकांडांनी नागपूर जिल्हा हादरला. एकाच वेळी खुनाच्या चार घटनांची जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील ही पहिलीच वेळ असून, या हत्याकांडांनी ग्रामीण पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. मौदा व बुटीबोरीतील मृतकांची ओळख पटलेली नाही. उमरेडमधील हत्याकांडात पोलिसांनी दोघांना अटक केली. पहिली घटना उमरेडमधील बायपास रोडवर मंगळवारी रात्री घडली. जुन्या वैमनस्यातून दोन युवकांनी संदीप ऊर्फ संजय इस्तारी खवास (वय ३४) याची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. उमरेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून महादेव मोहिनकर (वय २३) आणि विजय डहारे (वय २३) या दोघांना अटक केली. दुसरी घटना सावळी फाटा येथे घडली. गुनाकार इंगोले (वय ५२) यांना जमिनीत पुरलेला मृतदेह दिसला. तिसरी घटना बुटीबोरीतील बोरखेडी रेल्वे फाटकाजवळ घडली. डोक्यावर वार करून ३५वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. चौथी घटना काटोलमधील अर्जुननगर येथे घडली. जुन्या वैमनस्यातून दोघांनी चाकूने वार करून नीतेश ऊर्फ गिरीश गजबे (वय २१) याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी करण गवळी (वय २१) व अर्जुन माटे (वय २१ ) यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. दोघेही फरारी आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3rH7hFG
No comments:
Post a Comment