Breaking

Saturday, March 27, 2021

भाजप आमदाराला संतप्त शेतकऱ्यांची मारहाण, कपडेही फाडले https://ift.tt/3rvtaHW

चंदीगडः पंजाबमध्ये मुक्तसर जिल्ह्यातील मलोटमध्ये शेतकऱ्यांचा एका गटाने भाजप आमदाराला मारहाण केली. एवढचं नव्हे तर आमदाराचे कपडेही फाडले. पोलिसांनी ही माहिती दिली. अबोहरमधील आमदार अरुण नारंग हे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी मलोट येथे गेले होते. शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भाजप आमदाराला झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या माराहाणीदरम्यान पोलिसांनी नारंग यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. तर काही लोकांनी आपल्याला मारहाण केली आणि अंगावर काळी शाई फेकली, असं भाजप आमदार नारंग यांनी यांनी सांगितलं. पीटीआयने ह वृत्त दिलं आहे. या घटनेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिदर सिंग यांनी भाजप आमदाराला झालेल्या मारहाणीचा निषेध केला आहे. राज्यात शंतात बिघडवणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला आहे. परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा मुद्दा लवकर सोडवण्याचं अमरिंदर सिंग यांनी आवाहन केलं. आपण माध्यमांशी संवाद साधण्यासाठी मलोट येथे निघालो होतो. पण आंदोलन करणाऱ्यांनी आपल्याला विरोध केला. ते हिंसक झाले आणि त्यांनी मला घेरलं, असं त्यांनी सांगितलं. या प्रकरणी पक्ष नेतृत्वाशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले. अबोहरच्या भाजप आमदाराला मारहाण झाली. ही घटना अतिशय खेदजनक आहे. अशा घटनांचं आम्ही समर्थन करत नाही. या घटनेचा निषेध करतो, असं संयुक्त किसान मोर्चाचे नेते दर्शनपाल यांनी सांगितलं. दरम्यान, पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलानेही या घटनेचा निषेध केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3u02CAf

No comments:

Post a Comment