Breaking

Thursday, June 19, 2025

Ahmedabad Plane Crash मध्ये वाचलेल्या एकमेव व्यक्तीला अभिनेत्रीने म्हटलं खोटारडा! ट्रोल होताच मागितली माफी https://ift.tt/ItofESR

मुंबई- प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका हिच्या एका चुकीमुळे तिच्यावर बरीच टीका झाली आहे. तिच्या वक्तव्यामुळे बराच गोंधळ उडाला त्यानंतर तिने लगेच सोशल मीडियावर माफी मागितली. त्याचे झाले असे की, सुचित्रा कृष्णमूर्ती हिने अहमदाबाद विमान अपघातातील एकमेव वाचलेले प्रवासी यांना खोटारडा म्हटले. अभिनेत्री म्हणाली की विश्वास कुमार यांनी खोटे सांगितले आहे की ते अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानात होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे सुचित्रा कृष्णमूर्ती युजर्सच्या निशाण्यावर आहेत. विमान अपघातात विश्वास कुमार रमेश यांचे वाचणे हा एक चमत्कार मानला जात आहे. त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. 12 जून रोजी अहमदाबाद विमान अपघातात 270 जणांना आपला जीव गमवावा लागला. या भयंकर अपघातात प्रवासी विश्वास कुमार रमेश बचावले. परंतु सुचित्रा कृष्णमूर्तींनी त्यांच्या वाचण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वाद वाढल्यानंतर तिला तिची पोस्ट डिलीट करावी लागली. सुचित्रा कृष्णमूर्ती विश्वास कुमारला 'खोटारडे' म्हटले, त्याला मानसिक रुग्णालयात पाठवण्याची मागणी केली. सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी X वर लिहिले, 'तर हा विमानात प्रवासी असल्याचे आणि तो एकमेव वाचल्याचे खोटे बोलला? हे खरोखरच विचित्र आहे. यूकेमधील त्याच्या कुटुंबाने त्याने सांगितलेल्या गोष्टीची पुष्टी केली नाही का? त्याच्या भावाच्या अंत्यसंस्काराबद्दल काय, ज्यामध्ये तो खांदा देताना दिसून आला?' सुचित्राने पुढे लिहिले की जर हे खरे असेल तर विश्वास कुमार रमेश कठोर शिक्षेस पात्र आहेत. अन्यथा त्याला मानसिक रुग्णालयात पाठवले पाहिजे.' गायिकेच्या या विधानामुळे युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. त्यानंतर तिने ते ट्विट डिलीट केले. यावर अनेक युजर्सनी सुचित्रा कृष्णमूर्तींला लक्ष्य केले आणि तिला खरी खोटी सुनावली. युजर्स आणि अनेक पत्रकारांनी सुचित्रा कृष्णमूर्ती यांना सांगितले की, अहमदाबाद रुग्णालयानेच विश्वास कुमार एअर इंडियाच्या विमानात असल्याचा खुलासा केला आहे आणि हे माध्यमांमध्येही प्रसिद्ध झाले होते. हे पाहून सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी ते ट्विट डिलीट केले. मात्र, ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर सुचित्राने एक नवीन ट्विट केले ज्यामध्ये तिने सर्वांची माफी मागितली. तिने लिहिले की, 'एअर इंडिया विमान अपघातात वाचलेल्या व्यक्तीबद्दलचे माझे शेवटचे ट्विट डिलीट केले. असे दिसते की खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या, देवालाच माहित ते का झाले.... मी माफी मागते.' सुचित्राने असेही म्हटले की, तिच्या एका मैत्रिणीने सोशल मीडियावर चुकीची माहिती शेअर केली होती. तिला खूप वाईट वाटते की तिने ती चुकीची माहिती पुन्हा पोस्ट केली. तिने या बातमीची पडताळणीही केली नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/CyVh17H

No comments:

Post a Comment