Breaking

Tuesday, March 30, 2021

नितीन देणार आयुष्मानला टक्कर, समोर आला 'अंधाधुन' च्या रिमेकचा लुक https://ift.tt/3u6h21W

मुंबई- दाक्षिणात्य सुपरस्टार चाहत्यांचा प्रचंड लाडका आहे. त्याने चाहत्यांवर त्याच्या अभिनयाची भुरळ घातली आहे. नुकताच नितीनचा 'रंग दे' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद देत चित्रपट हिट केला होता. आता नितीनने आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. ३० मार्च रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने आगामी चित्रपटातील पहिला लुक प्रेक्षकांसमोर आणला. तो चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट बॉलिवूड अभिनेता याच्या सुपरहिट '' या चित्रपटाचा तेलगू रिमेक आहे. सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून नितीनच्या 'मेस्ट्रो' चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. त्यात नितीन 'अंधाधुन' मधल्या आयुष्मानप्रमाणे दिसत आहे. विशेष म्हणजे आयुष्मानप्रमाणे बनण्यासाठी त्याने बरीच मेहनत केलेली दिसत आहे. पोस्टरमध्ये तो एका पियानोवर चालत आहे. त्याच्या हातात एक काठी आहे आणि डोळ्यावर काळा चष्मा आहे. पियानो आणि काठीवर रक्त लागलेलं दिसत आहे. तरण यांनी एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. ज्यात चित्रपटातील काही दृश्य दाखवण्यात आली आहेत. अजून एका पोस्टरमध्ये नितीन पाठमोरा बसला आहे आणि त्याच्या बाजूला एक मांजर बसली आहे. प्रेक्षकांमध्ये नितीनच्या या चित्रपटाबद्दल बरीच उत्सुकता पाहायला मिळतेय. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ती चित्रपटात तब्बूची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री नाभा नतेश ही राधिका आपटेची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाची निर्मिती श्रेष्ठ मुव्हीज बॅनरतर्फे करण्यात येत आहे. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ११ जून २०२१ सांगितली जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cEtDnf

No comments:

Post a Comment