Breaking

Wednesday, March 31, 2021

हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही; सेनेचा विरोधकांना टोला https://ift.tt/3u9hkFi

मुंबई: महाराष्ट्रात लॉकडाऊन कराल तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्या राज्यातील विरोधी पक्ष भाजपवर शिवसेनेनं जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. 'हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही. एकमेकांना सहकार्य करून राज्यातील लोकांचे प्राण वाचविण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं आहे. करोना कुणालाही सोडत नाही,' असं शिवसेनेनं सुनावलं आहे. ( On ) राज्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं राज्य सरकारनं निर्बंध अधिकाधिक कठोर करण्याची तयारी चालवली आहे. वेळ पडल्यास लॉकडाऊनचा इशारा सरकारनं दिला आहे. मात्र, पुन्हा लॉकडाऊन करण्यास अनेकांचा विरोध आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी तर थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून विरोधी पक्षाला खडे बोल सुनावले आहेत. वाचा: 'राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाही, हे म्हणणं योग्यच आहे. पण टाळेबंदी करून लोकांना घरी बसायला लावण्याचा सरकारलाही काही छंद नाही. करोनाची दुसरी लाट अधिक भयंकर आहे. करोनाग्रस्तांच्या संख्यावाढीच्या स्पर्धेत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. हे काही आपल्याला शोभणारं नाही. लोकांचा निष्काळजीपणा आणि बेफिकिरी यास कारणीभूत आहे. महाराष्ट्रात सध्या फक्त रात्रीचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. हे निर्बंधदेखील पाळायला लोक तयार नसतील तर सरकारला कठोर उपाययोजना कराव्याच लागतील,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. 'उत्तर प्रदेशात मथुरेत-वृंदावनात लाखो लोकांनी होळीचा सण साजरा केला. त्यांना करोना होत नाही. मग आम्हालाच कसा होईल? हे तर्कट चुकीचं आहे. पश्चिम बंगालातील प्रचारसभेत हजारोंची गर्दी होतेच. अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली ‘विना मास्क’ रोड शोचे शक्तिप्रदर्शन होत आहे. मग महाराष्ट्रातच लॉक डाऊनचा विचार का करता? या प्रश्नांची उत्तरे राज्यातील रोज वाढणाऱ्या करोना संसर्गाच्या आकड्यात आहेत,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. शहराकडं लक्ष द्या! 'मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, नांदेड, नगर या शहरांनी करोनात आघाडी घेतली आहे. राज्यात सर्वाधिक मृत्यू नागपुरात होत आहेत. मंगळवारी एकट्या नागपुरात ५४ रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळं विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी नागपूर महापालिका व शहराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. लोकांनी बेदरकारपणा थांबवला नाही तर सरकारला कडक पावले उचलण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सरकारनं कडक पावलं उचलली तर विरोधी पक्ष तांडव करणार. विरोधी पक्षानं तांडव केलं तर त्याचे दुष्परिणाम जनतेलाच भोगावे लागणार,' असा इशाराही शिवसेनेनं दिला आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cDdsqc

No comments:

Post a Comment