Breaking

Wednesday, March 31, 2021

PPF सह अन्य बचतींवरील व्याजकपात मागे; काही तासांत निर्णय बदलला https://ift.tt/3djPWh0

मुंबई: भविष्य निर्वाह निधी (PPF) सह अन्य अल्पबचत योजनांमधील गुंतवणुकीवरील व्याजाला कात्री लावण्याचा निर्णय केंद्र सरकारनं मागे घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. त्यानुसार पुढील आर्थिक वर्षासाठी अल्पबचत योजनांवरील व्याजदर 'जैसे थे' राहणार आहेत. नजरचुकीने काढले गेलेले हे आदेश मागे घेण्यात येत आहेत, असं सीतारामन यांनी म्हटलं आहे. करोनाच्या संकटामुळे मागील वर्षी सलग तीन तिमाहीत सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदर स्थिर ठेवले होते. मात्र, आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी सुधारीत दरांची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, अल्प बचतीच्या योजनांवरील व्याजदरात मोठी कपात करण्यात आली होती. हे नवे दर आजपासून लागू होणार होते. मात्र, हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अल्पबचत योजनांवरील व्याजदर २०२०-२१ या आर्थिक वर्षीच्या अखेरच्या तिमाहीतील दरांइतकेच असतील, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. वाचा: कालच्या निर्णयानुसार व्याजदर लागू झाले असते तर त्याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक व सुकन्या समृद्धी योजनेला बसला असता. पीपीएफवरील व्याजदर ६.४ टक्क्यांपर्यंत खाली येणार होते. १९७४ नंतर हा व्याजदर सर्वात कमी होता. मात्र, सरकारच्या माघारीमुळे हे टळले आहे. केंद्र सरकारने काल जाहीर केलेले सुधारीत व्याजदर वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cBekvn

No comments:

Post a Comment