नायजर: नायजेरियाच्या दक्षिण-पूर्व भागात काहींनी पोलीस आणि लष्कराच्या इमारतीवर गोळीबार करत हल्ला केला. या गोळीबारानंतर या ठिकाणी असलेल्या तुरुंगातून एकाच वेळी दोन हजार कैद्यांनी पलायन केले असल्याचे समोर आले आहे. हा हल्ला सोमवारी, ओवेरी शहरात झाला. जवळपास दोन तास गोळीबार सुरू होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. या हल्ल्यामध्ये सरकारी इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. मात्र, या हल्ल्यामागे फुटीरतावादी गट जबाबदार असल्याचे पोलीस महानिरीक्षकांनी म्हटले आहे. वाचा: वाचा: नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मद बुहारी सध्या प्रकृतीच्या कारणास्तव दोन आठवड्यांसाठी लंडनमध्ये आहेत. त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले. या घटनेनंतर नजीकच्या दोन शहरांमध्ये संचार बंदी लागू करण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3wtp0nR
No comments:
Post a Comment