Breaking

Saturday, April 17, 2021

पुणे: मिलिंद मराठे आत्महत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल https://ift.tt/2OZhLTN

म. टा. प्रतिनिधी, 'मराठे ज्वेलर्स'चे मिलिंद उर्फ बळवंत मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दोन व्यक्तींविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक अडचणीतून मराठे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत बळवंत मराठे यांच्या पत्नी नीना बळवंत मराठे (वय ६०, रा. रुपाली सोसायटी, एरंडवणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार दीप्ती सरोज काळे (रा. बावधन, उत्तमनगर) आणि नीलेश उमेश शेलार (रा. मानकर रेसिडेन्सी, कोथरूड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१८ ते १५ डिसेंबर २०२० दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठे ज्वेलर्समध्ये अनेकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांचे पैसे परत न करता मराठे यांनी फसवणूक केली. गेल्या महिन्यात कोथरूड पोलिस ठाण्यात मराठे यांच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध एक कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस अधिक तपास करत आहेत. तक्रारीत काय? - मराठे ज्वेलर्स येथे गुंतवणूक केलेले पैसे परत मागण्यासाठी काळे व शेलार यांनी वेळोवेळी त्यांच्या घरी व दुकानावर येऊन शिवीगाळ केली; धमकीही दिली. - फोनवरूनही वारंवार वाईट भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली. कुटुंबाला रस्त्यावर आणण्याची धमकी दिली. असभ्य भाषेत बोलून त्यांचा अपमान केला. - शिवीगाळ करून मुलांचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन बळवंत मराठे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3v0ibbE

No comments:

Post a Comment