मुंबई: महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलल्याचा दावा देशातील सर्वच राज्य सरकारे करत असतात. पण सर्वसामान्य महिलांचे रक्षण करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यावरच बलात्काराची घटना घडली आहे. मुंबईत ही घटना घडली आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर करण्यात आल्याची घटना घडली असून, पीडितेने सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील पोलीस ठाण्यात पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीच्या आधारे डोंगरी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सहायक पोलीस निरीक्षकाने लग्नाच्या भूलथापा देऊन अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिला अधिकाऱ्याने केला आहे. पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार, लग्नासंबंधी विचारले असता, आरोपीने स्पष्ट शब्दांत नकार दिला. पीडितेच्या तक्रारीनंतर डोंगरी पोलिसांनी आरोपी सहायक पोलीस निरीक्षक आणि त्याच्या कुटुंबातील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलीस अधिकारी हा दक्षिण मुंबईतील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे, अशी माहिती मिळते. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3sqGgGT
No comments:
Post a Comment