म. टा. प्रतिनिधी, ठाणे ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन नाही...आपण रक्षणकर्ते आहात, ठाणेकरांचे जीव वाचवा, त्यांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढा..., असे संदेश लिहिलेले पोस्टर हातात घेऊन मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर राज्याचे गृहनिर्माणमंत्री यांच्या पत्नी यांनी ठिय्या आंदोलन केले. गृहनिर्माण मंत्र्यांच्या पत्नी निरनिराळ्या सामाजिक संस्थांचे काम करत असल्याने राज्याच्या निरनिराळ्या भागांतून ऑक्सिजन, रेमडेसिवीरसाठी सातत्याने मागणी होत आहे. ठाणे शहरातील खासगी रुग्णालये ऑक्सिजनसाठी पळापळ करत आहेत. अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये महापालिकेचे नेतृत्व असलेल्या आयुक्तांकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचा थेट हल्लाबोल ऋता आव्हाड यांनी केला. वाचा: ठाणे शहरातील करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शहरातील यंत्रणा अपुरी पडू लागली असून रुग्ण आणि रुग्णालयांनाही मदत करण्यात ठाणे महापालिका अपयशी ठरू लागली आहे. ठाणे शहरातील या परिस्थितीवरून राष्ट्रवादीच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात येत आहे. राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात साहित्याच्या गैरव्यवहाराचा आरोप केला होता. काही दिवसांमध्ये संबंधित अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पकडला गेला. विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या माध्यमातून भाईंदरपाडा विलगीकरण कक्षाची पाहणी, खासगी रुग्णालयांच्या ऑक्सिजनसाठीच्या पाठपुराव्यामध्ये महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला होता. मंगळवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा असल्याने या दिवशीच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी विरोधीपक्ष नेते शानू अश्रफ पठाण यांच्यासह ऑक्सिजनचा सिलिंडर घेऊन महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. मनसे आणि काँग्रेसनेही या आंदोलनास पाठिंबा दर्शवला. ऑक्सिजनसाठी मंत्री म्हणून प्रयत्न सुरू असले तरी महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न दिसत नसल्याची तक्रार त्यांनी केली. आयुक्त म्हणून नागरिकांच्या मदतीस उतरण्यामध्ये आयुक्त कमी पडत असल्याचा थेट हल्ला त्यांनी यावेळी केला. उपायुक्त संदीप माळवी यांनी ऋता आव्हाड यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तीन तास आंदोलन केल्यानंतर त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. वाचा: ठाण्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटर्सची अवस्था गंभीर आहे. ज्या प्रमाणात शहरात रुग्ण आहेत, त्यांच्या ३० टक्केइतकेदेखील ऑक्सिजन रुग्णालयांकडे नाही. आमच्यासारख्यांना अशा प्रकारे आंदोलन करावे लागत असेल तर ज्याच्या घरी करोनाचा रुग्ण आहे, त्यांची काय अवस्था होत असेल? आज आमचा कडेलोट झाला आहे. जरी माझा नवरा मंत्री असला तरी रुग्णालयांचे फोन मला आले. रुग्णांना उपचार करायचे कसे? असा प्रश्न विचारला गेला. - ऋता आव्हाड, जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3go4TBS
No comments:
Post a Comment