Breaking

Tuesday, April 20, 2021

तूर्त दिलासा ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेल दर https://ift.tt/3av77vk

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. देशात सलग सहाव्या दिवशी आणि स्थिर आहे.आज बुधवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८७.८१ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.४१ रुपये आहे. सहा दिवसांपूर्वी पेट्रोल १६ पैसे आणि डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले होते. अमेरिका आणि युरोपात पुन्हा एकदा करोनाचा कहर वाढत आहे. भारतात मागील आठवडाभरापासून करोना रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर लाॅकडाउनची शक्यता वाढली आहे. अमेरिकेत मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण दिसून आली. ब्रेंट क्रूडचा भाव ०.३७ डॉलरच्या घसरणीसह ६६.२२ डॉलर झाला. तर यूएस टेक्सासमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.९४ डॉलरच्या घसरणीसह ६२.४४ डॉलर प्रती बॅरल झाला. दरम्यान, भारतात करोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी काही राज्यांनी रात्रीची कठोर संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे इंधन मागणीवर परिणाम होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ५३ लाख २१ हजार ०८९ वर पोहचलीय. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा हे रुग्ण डॉक्टरांच्या निर्देशावर आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ८० हजार ५३० नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात २० लाख ३१ हजार ९७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3xcsoDW

No comments:

Post a Comment