Breaking

Saturday, April 10, 2021

कतरिनाशी दोन मिनिटं बोलणं विराटसाठी ठरला होता मोठा क्षण https://ift.tt/2Q7NAdc

मुंबई: आयपील २०२१ चा थरार ९ एप्रिलपासून सुरू झाला आहे. पहिला सामना रोहित शर्माचा संघ मुंबई इंडियन्स विरुद्ध विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात रंगला. हा सामना विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा २ विकेटनी पराभव केला. अशात आता विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात त्यानं अभिनेत्री कतरिना कैफचा उल्लेख केला होता. आज क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध आणि सर्वात मोठं नाव आहे. जगभरात त्याचा चाहतावर्ग आहे आणि अनुष्का शर्माशी लग्न केल्यानंतर बॉलिवूडशी त्याचे अनेकांशी चांगले संबंध प्रस्थापित झाल्याचे पाहायला मिळतात. पण एक वेळ अशी होती की, कतरिना कैफसोबत दोन मिनिटं बोलणं ही विराटसाठी मैदानाबाहेरील सर्वांत मोठी गोष्ट होती. विराटचा हे सांगतानाचा एक व्हिडीओ त्याच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. जो त्याच्या करिअरच्या अगदीच सुरुवातीच्या काळातला आहे. व्हिडीओमध्ये अँकर वाणी जे विराट कोहलीला विचारते, 'तुझ्यासाठी आतापर्यंत ऑफ फिल्ड सर्वात मोठी गोष्ट कोणती?' त्यावर विराट म्हणतो, 'ऑफ फिल्ड? कतरिना कैफशी मी दोन मिनिटं बोललो होतो. ही माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट होती.' यावर वाणी पुन्हा त्याला विचारते, 'खरंच?' त्यावर विराट म्हणतो, 'हो खरंच, मी खोटं का बोलू?' कतरिना कैफशी बोलणं ही सर्वात मोठी गोष्ट मानणाऱ्या विराटचं बॉलिवूडशी नातं त्यावेळी जोडलं गेलं जेव्हा त्यानं २०१७ मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केलं. अनुष्कानं बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. एवढंच नाही तर कतरिनासोबत तिनं शाहरुख खानच्या जब तक है जान आणि झीरो अशा दोन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान जानेवारीमध्ये विराट-अनुष्का आई-बाबा झाले आहेत. सध्या एकीकडे विराट आयपीएल खेळत आहे तर दुसरीकडे कतरिना कैफला करोनाची लागण झाल्यानं ती होम क्वारंटाइन आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2RfsoT0

No comments:

Post a Comment