Breaking

Sunday, April 18, 2021

करोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज का भासते? https://ift.tt/2QhsYPY

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई संसर्गामध्ये लक्षणांची तीव्रता जसजशी वाढत जाते तसा फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. ही कार्यक्षमता अनेक जणांमध्ये हळूहळू कमी होत जाते. श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. सर्वसामान्य व्यक्तीच्या शरीरात ९५ ते ९९ टक्के असतो. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा कमी झाले तर श्वास घेण्यात अडचणी येतात. ताप, खोकला, दम लागणे यासारख्या लक्षणांसह शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी होऊ नये, यासाठी कृत्रिम ऑक्सिजन देण्याची गरज लागते. पालिका रुग्णालयांतील वीस ते पंचवीस टक्के रुग्णांना कोविड उपचारादरम्यान विविध पातळ्यांवरील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची गरज असते. ही गरज रुग्णनिहाय ठरते. त्या रुग्णांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता, शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण आणि न्यूमोनियाची तीव्रता, इतर लक्षणांमधील गुंतागुंत या आधारे ऑक्सिजनचे प्रमाण किती द्यायचे हे ठरते. ९५च्या खाली ऑक्सिजन असलेल्या रुग्णांनाही त्याची जशी गरज असते तसेच पन्नास ते सत्तर लीटर प्रती मिनिट इतकी गरज असलेल्या व्यक्तींना ऑक्सिजनही गरज भासू शकते. त्यामुळे जोपर्यंत रुग्ण वैद्यकीयदृष्ट्या स्थिर होत नाही तोपर्यंत त्याला ऑक्सिजनच्या पुरवठ्याची गरज लागू शकते. रुग्णाला ऑक्सिजनचा वापर हा शरीरातील प्राणवायूची पातळी कमी झाल्यावर करावा लागतो. तसेच इतरही लक्षणे असलेल्या रुग्णालाही ऑक्सिजनवर ठेवण्याची गरज असते, याकडे भाभा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अदित्य अणवेकर लक्ष वेधतात. काय आहेत अडचणी? अनेक रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारे उत्पादक तसेच पुरवठादार आहे त्यांच्याकडून कच्चा माल येत नसल्याच्या, वाहतुकीमध्ये अडचणी येत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा करण्यापूर्वी ते सिलिंडर रिफिलर्सकडे जातात. या रिफिलर्सनी दरामध्ये वाढ केल्यामुळे चार हजार रुपयांचा सिलिंडर आता अठरा ते एकवीस हजार रुपयांपर्यंत जातो. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाचा निर्धारित दाब कमी केला तर त्याला पुन्हा त्या स्थिर वैद्यकीय पातळीवर येण्यासाठी अधिक कालावधी लागतो. काही वेळा या रुग्णाला दीर्घकाळ लागू शकतो. कोविड रुग्णालयांना पुरवठा रविवारी तिसऱ्या दिवशीही मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याचा गोंधळ सुरू होता. त्यावर उपाय म्हणून अनेक नॉन कोविड रुग्णालयांनी कोविड रुग्णालयांना ताप्तुरत्या स्वरूपात ऑक्सिजनचे काही सिलिंडर्स दिले आहेत. मात्र पुरवठा अद्याप सुरळीत झाला नाही तर ही सुविधाही वापरता येणार नाही. काही स्वयंसेवी संस्थांनी गट तयार करून उपनगरामध्ये प्राणवायू पुरवठा करण्यासाठी समन्वय निर्मण केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3gmd9SY

No comments:

Post a Comment