पुणे: देवराई, दोघी, दहावी फ अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या ७७ वर्षांच्या होत्या. दहावी फ, एक कप च्या, वास्तुपुरुष, संहिता असे अनेक मराठी चित्रपट व हिंदी लघुपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. सुमित्रा भावे यांच्या निधनामुळं पठडीबाहेरची वाट चोखाळणाऱ्या एका प्रतिभावंत दिग्दर्शिकेला गमावल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त होत आहे. सुमित्रा भावे यांनी सुमारे १४ चित्रपट, ५० हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिकांसाठी लेखन केले होते. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून पदवी घेतल्यावर विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन विषयात एम. ए. केले. शिवाय त्यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची ग्रामविकास विषयाची पदविका मिळविली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले. पुण्याच्या कर्वे विद्यापीठाच्या समाजसेवा संस्थेत दहा वर्षे प्राध्यापक आणि त्यानंतर सरकारप्रणीत कम्युनिटी अॅड अँड स्पॉन्सरशिपच्या त्या कार्यक्रम व्यवस्थापिका होत्या. त्यांच्या अनेक समाजकल्याणविषयक शोधपत्रिका प्रकाशित झाल्या होत्या. आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका होत्या. वयाच्या पंच्चाहत्तरीनंतरही त्या सिनेसृष्टीत जोमाने कार्यरत होत्या.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2RCTaF6
No comments:
Post a Comment