Breaking

Friday, April 23, 2021

फ्रान्स: पोलीस स्टेशनमध्ये घुसून महिला पोलिसाची हत्या; हल्लेखोर ठार https://ift.tt/32FThSC

पॅरिस: फ्रान्समधील रॅमबॉयले प्रांतातील पोलीस ठाण्यात घुसून एका महिला पोलिसांची हत्या करण्यात आली. प्रत्युत्तरात झालेल्या कारवाईत हल्लेखोर ठार झाला आहे. या हल्लेखोराने महिला पोलिसावर चाकू हल्ला केला. त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर फ्रान्समध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेची दहशतवादविरोधी पथकाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी हा हल्ला असल्याचे पत्रकारांना सांगितले. दहशतवादाविरोधात लढण्याचा निर्धार कायम असून कोणत्याही परिस्थितीत आमची दहशतवादविरोधी भूमिका बदलणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्यात ठार झालेल्या महिला पोलिसांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी संपूर्ण देश असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले. वाचा: वाचा: फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी म्हटले की, फ्रान्स दहशतवादाविरोधातील लढा सोडणार नाही. स्टेफिनी एक पोलिस अधिकारी होती. तिच्या पोलीस स्टेशनमध्ये तिची हत्या करण्यात आली. संपूर्ण देश तिचे कुटुंबीय, सहकारी, पोलिसांच्या पाठिशी आहे. इस्लामिक दहशतवादाविरोधात आमचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले. वाचा: हल्लेखोराने पोलीस ठाण्यात शिरल्यानंतर आरडाओरड करत काही घोषणा दिल्या आणि पोलिसांवर हल्ला केला असल्याचे दहशतवादविरोधी पथकाचे वकील जीन फ्रॅन्कोइस रिकार्ड यांनी सांगितले. त्यामुळे आता दहशतवादविरोधी पथकाकडून तपास करण्यात येत आहे. हल्लेखोराच्या जवळच्या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त 'सीएनएन'ने दिले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3aDX6fo

No comments:

Post a Comment