राजलक्ष्मी पुजारे । राज्यातील आरोग्य प्रशासन कोविडशी झुंजत असताना दुसरीकडं रुग्णालयांतील अपघातांची मालिका सुरूच आहे. नाशिकमधील ऑक्सिजन गळती, विरारच्या हॉस्पिटलमधील आगीच्या घटनांनंतर आता डोंबिवलीतील कोविड रुग्णालयात लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. (Lift Accident at Dombivli Hospital) डोंबिवलीमधील कल्याण शीळ रोड येथील एस एस टी वैद्यरत्न या कोविड रुग्णालयात हा प्रकार घडला. अपघातग्रस्त लिफ्टमध्ये एकूण चौघे जण होते. त्यात एक रुग्ण होता. तांत्रिक बिघाड झाल्यानं पहिल्या माळ्यावरून ही लिफ्ट खाली कोसळली. त्यात हे चौघे जखमी झाले. सुदैवानं त्यांचा जीव वाचला. तांत्रिक बिघाडामुळं हा प्रकार घडल्याचं रुग्णालय प्रशासनानं म्हटलं आहे. वाचा: डोंबिवलीमधील कल्याण शीळ रोड जवळ एस एस टी वैद्यरत्न हे कोविड रुग्णालय आहे. शुक्रवारी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आशा महाजन (वय ४३), दिलीप महाजन (५६), हे दाम्पत्य आपल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन आले. आशा नारकर या महिला कर्मचाऱ्यासह चौघे जण लिफ्टमधून पहिल्या माळ्यावर जात होते. पहिल्या मजल्यावर लिफ्ट अचानक अडकली. यावेळी लिफ्टमधील चौघे जण घाबरले. त्यांनी लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र अचानक लिफ्ट खाली कोसळली. या दुर्घटनेत लिफ्टमध्ये असलेल्या चौघांना गंभीर दुखापत झाली आहे. महाजन यांच्या करोनाग्रस्त मुलालाही दुखापत झाली असून त्याला याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर अन्य तिघांना उपचारासाठी डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वाचा: तांत्रिक बिघाडामुळं ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत देखभाल दुरुस्ती विभागाला कळवलं आहे. या रुग्णांवरील उपचाराचा संपूर्ण खर्च आमच्याकडून केला जाईल, असं रुग्णालयानं स्पष्ट केलं आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3aw9SN9
No comments:
Post a Comment