इंदूर : देशात करोना संसर्गानं हाहाकार उडवून दिला असला तरी अनेक ठिकाणी अनपेक्षित अशा सुखद घटना मनाला दिलासा देणाऱ्या आणि आशादायक ठरत आहेत. रुग्णालयांत वाढलेली गर्दी, ऑक्सिजनची कमतरता, स्मशानांमध्ये जळणारी लाकडे अशा अनेक मनाला बेचैन करणाऱ्या गोष्टी आजुबाजुला दिसत असल्या तरी त्यासोबतच अनेक गोष्टीही दिसून येत आहेत. आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच एक ९७ वर्षीय आजी करोनावर मात करून आपल्या घरी परतल्याचं समजल्यानंतर सामान्यातल्या असामान्य अशा या घटनेचं तुम्हीही कौतुक कराल. इंदूरमध्ये ९७ वर्षीय शांतिबाई दुबे या आढळल्या होत्या. शांतिबाई यांचा जन्म १९२५ सालचा... रामनवमीच्या दिवशी त्या जन्मल्या होत्या. त्यामुळे तिथीनुसारच आपला वाढदिवस लक्षात ठेवणाऱ्या शांतिबाईंसाठी यंदाचा रामनवमीचा दिवसही खास ठरला. वाचा : वाचा : ९७ वर्षांच्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती करोनापुढे अपुरी पडू शकते, अशी भीती शांतिबाईंच्या कुटुंबीयांच्या मनातही होती. उज्जैनच्या रहिवासीी असलेल्या शांतिबाई यांच्या फुफ्फुसापर्यंत ८० टक्के संक्रमण पोहचलं होतं. त्यामुळे ८ एप्रिल रोजी इंदूरच्या इंडेक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जाणवत असल्यानं त्यांना करण्यात आला होता. परंतु, केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर शांतिबाईंनी करोनावर मात केलीय. शांतिबाईंच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल रोजी आजींची प्रकृती खालावत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीनं एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शांतिबाईंचा रक्तदाबही वाढला होता. रुग्णालयातही सुरुवातीला त्या उपचारांना प्रतिसाद देत नव्हत्या. सिटी स्कॅनमध्ये फुफ्फुसांपर्यंत ८० टक्के संक्रमण पोहचल्याचं समजलं. त्यानंतर त्यांना इंदूरला हलवण्यात आलं होतं. इथे मात्र करोनावर मात करत आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी शांतिबाई सुखरुपरित्या घरी परतल्या.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3sNrkTE
No comments:
Post a Comment