लंडन: करोनाच्या संसर्गाचा पुन्हा एकदा जोर वाढला असून अनेक देशांमध्ये संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. काही देशांमध्ये लसीकरण जोरात सुरू आहे. नुकत्याच करोना लशीबाबत करण्यात आलेल्या अभ्यासात महत्त्वाची बाब समोर आली आहे. करोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर संसर्गाचा धोका ६५ टक्के कमी होत असल्याचे समोर आले आहे. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक द्वारे हे संशोधन करण्यात आले. मात्र, हे संशोधन अद्याप प्रकाशित करण्यात आले नाही. ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनका, फायजर-बायोएनटेकच्या लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर संसर्गाचा धोका ६५ टक्के कमी होतो. लशीच्या एका डोसमुळे वयस्कर, युवक आणि निरोधी व्यक्तींना संसर्गाची लागण होण्याचा धोका खूप कमी झाला असल्याचेही या अभ्यासात आढळले. वाचा: वाचा: या अभ्यास संशोधनानंतर लशीमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या आणि संसर्गामुळे होणाऱ्या मृतांची संख्या कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, संशोधकांनी सतर्कतेचा इशारा देताना म्हटले की, लस घेतल्यानंतरही करोनाच्या संसर्गाची लागण होऊ शकते आणि लक्षणे दिसत नसतानाही बाधित झाल्यास हा जीवघेणा विषाणू फैलावू शकतो. त्याचमुळे मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टेंसिंग ठेवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. वाचा: वाचा: तीन लाख लोकांचा अभ्यास संशोधकांनी सप्टेंबर २०२० ते एप्रिल २०२१ दरम्यान ब्रिटनमधील तीन लाख ५० हजार लोकांच्या चाचणी अहवालाचे विश्लेषण केले आहे. लशीचा पहिला डोस घेतल्यानंकर २१ दिवसानंतर संसर्गाची बाधा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. लस घेतल्यानंतर मानवी शरिरात करोना विषाणू विरोधात प्रतिकार शक्ती विकसित होण्यास २१ दिवसांचा वेळ लागतो.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32FvEd0
No comments:
Post a Comment