म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई संसर्गाची लागण होण्याचे प्रमाण हे ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत आता तरुणांमध्ये अधिक वाढते आहे. मात्र, करोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी १० हजार ६८३ मृत्यू हे ५० वयोगटावरील रुग्णांचे आहेत. आतापर्यंत मुंबईत कोविडमुळे १२ हजार २९४ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यातील दहा हजारांहून अधिक मृत्यू हे पन्नाशीपुढील वयोगटातील असल्याचे पालिका प्रशासनाने दिलेल्या वैद्यकीय विश्लेषणावरून दिसते. यात सहआजार असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक होते. त्यातील काही रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी उशिरा आले. हा महत्त्वाचा कालावधी या रुग्णांनी वाया घालवला. त्यामुळेही त्यांच्यात लक्षणांची तीव्रता वाढल्यामुळे संसर्गावर मात करणे त्यांना शक्य झाले नाही, याकडे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. व्ही. एस. महाडीक लक्ष वेधतात. वाचा: मुंबईमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या पाच लाख ७० हजार ८३२ इतकी असून, त्यापैकी बऱ्या झालेल्या चार लाख ६९ हजार ९६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या १६ हजार ६५८ असून, या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, तर लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ६९ हजार ३३० इतकी नोंदवण्यात आली आहे. उपचाराधीन रुग्णांचे मुंबईतील एकूण प्रमाण ८७ हजार ३६९ नोंदवण्यात आले आहे. अत्यवस्थ रुग्णांची संख्या मुंबईमध्ये एक लाख ३८१ असल्याचे दिसते. चाचण्यांची संख्या अधिकाधिक वाढवण्यावर भर देण्याची गरज आहे. शहरात ४९ लाख ४५ हजार ९७६ चाचण्या करण्यात आल्या असून, पॉझिटिव्हिटी दर हा ११.५४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. १९ व्हेंटिलेटरची उपलब्धता मुंबईच्या सर्व कोविड खाटांची क्षमता ही २८ हजार १८१ इतकी असून, सध्या त्यापैकी सहा हजार २०६ खाटा रिक्त आहेत. ऑक्सिजनची क्षमता असलेल्या १० हजार २२७ खाटापैकी ९ हजार ५६६ खाटा भरल्या असून, केवळ ६६१ खाटा रिक्त आहे; तर आयसीयू खाटांची क्षमता ही २,७६५ असली, तरीही त्यापैकी २,७२२ खाटा भरल्या असून, ४३ खाटा रिक्त आहेत. सर्व कोविड सुविधांमध्ये केवळ १९ व्हेंटिलेटर सध्या शहरात उपलब्ध आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3drr8VI
No comments:
Post a Comment