म. टा. विशेष प्रतिनिधी, शिवसेनेचे युवानेते मंत्री असलेल्या राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या https://ift.tt/1lmk8VQ या वेबसाइटवर मराठीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 'मराठीच्या जीवावर जो पक्ष मोठा झाला त्याच पक्षाचे मंत्री असलेल्या विभागाकडून मराठीला मिळत असलेली दुय्यम वागणूक ही निषेधार्ह आहे. पर्यटन महामंडळाच्या वेबसाइटवर तातडीने मराठीचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात यावा,' असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यांना पाठवण्यात आले आहे. याबाबत लवकर कार्यवाही झाली नाही, तर आंदोलनाचा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी दिला. वाचा: राज्याच्या पर्यटन विभागाकडून गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने नवनवीन घोषणा करण्यात येत आहेत. याची सर्व माहिती विभागाच्या संकेतस्थळावरही देण्यात येत आहे. अतिशय आकर्षक स्वरूपात बनवण्यात आलेला या वेबसाइटवर मराठीला मात्र दुय्यम वागणूक देण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. कृषी पर्यटनबाबतचे एखादे पत्रक, काही विभागांच्या नावाच्या ठिकाणी नाममात्र मराठीचा वापर करण्यात आला आहे, असा आरोप मनसेने केला आहे. पर्यटनप्रेमींकडूनही तक्रारी जगभरातील पर्यटकांना राज्यातील पर्यटनस्थळांविषयी माहिती व्हावी या दृष्टीने वेबसाइटवर इंग्रजी पर्याय नक्की वापरावा. मात्र, याचा अर्थ मराठीला बाहेरचा रस्ता दाखवावा असा अजिबात होत नाही. मराठीमध्ये सर्व माहितीही पर्यटकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. इतर राज्यांच्या पर्यटन विभागाच्या वेबसाइट या स्थानिक भाषेत असून, त्यानंतर त्यांनी इंग्रजी भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे, याकडे पर्यटनप्रेमींनी लक्ष वेधले. याबाबत महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3aiRpmT
No comments:
Post a Comment