मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यनने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. कधी त्याच्या पोस्टवरून तर कधी त्याच्या सिनेमावरून निर्माण झालेल्या वादावरून... असा हा चर्चेत असलेला अभिनेता सोशल मीडियावरही चांगलाच सक्रीय असतो. 'दोस्ताना २'सिनेमावरून निर्माण झालेल्या वादामुळे कार्तिक काही दिवस सोशल मीडियापासून दूर होता परंतु आता तो पुन्हा सक्रीय झाला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याचे काही मजेशीर अंदाजातील फोटो अनेकदा पोस्ट करत असतो. त्याचे हे फोटो त्याच्या चाहत्यांनाही खूप आवडतात, त्यावर ते देखील प्रतिक्रिया देतात. अलिकडेच कार्तिकने एक मजेशीर अंदाजातील त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत घराबाहेर जाताना मास्क आवर्जून घाला असे आवाहन त्याने केले आहे. मात्र, कार्तिकने या फोटोमध्ये मात्र त्याचा मास्क नाकाच्या खाली घेतलेला दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत कार्तिक लिहितो, 'बाहेर गर्दीत गेल्यावर असं करण्याचा कधीच प्रयत्न करू नका...' याबरोबरच त्याने हॅशटॅग मास्क हा टॅग वापरला आहे. कार्तिकची ही पोस्ट त्याच्या चाहत्यांना खूपच आवडली असून त्यावर ते सतत प्रतिक्रिया येत आहेत. काही दिवसांपूर्वी 'दोस्ताना २' या सिनमावरून खूपच वाद निर्माण झाला होता. धर्मा प्रॉडक्शनच्या या सिनेमातून कार्तिकला काढून ढाकण्यात आल्याची घोषणा झाली तसेच त्यानंतर आगामी कोणत्या ही सिनेमात त्याला काम देणार नसल्याचेही जाहीर करण्यात आले होते. धर्मा प्रॉडक्शनने एक अधिकृत ट्विट देखील केले होते. काही कारणांमुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागल्याचे प्रॉडक्शनकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, यावरून सोशल मीडियावर खूप वाद निर्माण झाला होता. त्यात अभिनेत्री कंगना रणौतने उडी घेत कार्तिकची बाजू घेतली होती. या सर्व घडामोडींनंतर कार्तिक काही काळ सोशल मीडियापासून दूर होता. याप्रकरणी कार्तिकने अद्याप त्याची बाजू मांडलेली नाही. कार्तिकच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर त्याचा 'धमाका' हा सिनेमा या वर्षाखेर प्रदर्शित होईल. तसेच 'भूल भुलैय्या २'या सिनेमातही कार्तिक काम करत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32RvU8Y
No comments:
Post a Comment