Breaking

Thursday, April 22, 2021

विरार हॉस्पिटल आग: मुख्यमंत्री ठाकरेंनी केले अधिकाऱ्यांना फोन https://ift.tt/3dH6eSs

मुंबई: विरारमधील विजय वल्लभ या रुग्णालयाला लागलेल्या आगीत आज १३ करोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नाशिकमधील ऑक्सिजन गळतीनंतर घडलेल्या या दुर्घटनेमुळं संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं असून स्थानिक प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ('s Reaction On Virar Covid Hospital Fire) वाचा: मुख्यमंत्री कार्यालयानं या संदर्भात ट्वीट केलं आहे. विरारमधील आगीच्या दुर्घटनेबद्दल समजताच मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष द्या, त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 'विजय वल्लभ हॉस्पिटल खासगी आहे. तिथं अग्निसुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ''रुग्णालयांची सुरक्षितता, फायर ऑडिट करण्याचे निर्देश देऊनही अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्यात आणि देशातही अशा घटना वाढल्या आहेत. यामागची कारणे उच्चस्तरीय समितीकडून शोधून त्रुटी कायमस्वरूपी दूर करण्याची बाब गांभीर्याने घेतली जाईल,' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3tWFkvP

No comments:

Post a Comment