Breaking

Thursday, April 22, 2021

ऑक्सिजनअभावी दिल्लीत २५ रुग्णांनी सोडला प्राण, ६० जणांचा जीव धोक्यात https://ift.tt/3ncubnT

नवी : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस आटोक्याबाहेर जाणारी परिस्थिती भयानक होताना दिसतेय. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात गेल्या २४ तासांत ऑक्सिजनअभावी २५ रुग्णांनी प्राण सोडलाय. तर गंभीर अवस्थेत असलेल्या ६० रुग्णांचा जीव धोक्यात आहे. रुग्णालयात अवघ्या दोन तास पुरेल एवढाच साठा उपलब्ध असल्याचा तातडीचा संदेश रुग्णालयाकडून प्रशासनाला पाठवण्यात आलाय. रुग्णालयाच्या मेडिकल डिपार्टमेंटच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात आहे. पुढच्या दोन तासांत उरलेला ऑक्सिजनही संपुष्टात येईल. आणि बायलेव्हल पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर योग्य पद्धतीनं काम करत नाही. रुग्णालयात आयसीयू आणि ईडीमध्ये मॅन्युअल पद्धतीनं व्हेन्टिलेशन सुरू असल्याचंही रुग्णालयानं म्हटलंय. त्वरीत पुरवठा होण्यासाठी हवाई मार्गानं ऑक्सिजन पोहचवण्याची आवश्यकता आहे. आणखीन ६० रुग्णांचा जीव धोक्यात आहे. वेळेवर ऑक्सिजन मिळाला नाही तर हे रुग्णांनाही वाचवण्यात यश येणार नाही, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केलीय. दिल्लीतील अनेक रुग्णांलयांत हीच परिस्थिती गुरुवारी दिल्लीतील शांती मुकुंद रुग्णालयातही अशीच परिस्थिती समोर आली होती. हॉस्पिटलचे सीईओ सुनील सागर यांना तर ऑक्सिजनच्या तुटवड्याबद्दल आणि आपल्या हतबलतेबद्दल बोलताना रडू कोसळलं होतं. डॉक्टरच आढळले होते करोना पॉझिटिव्ह काही दिवसांपूर्वी सर गंगाराम रुग्णालयात ३७ डॉक्टर करोना पॉझिटिव्ह आढळले होते. यातील पाच जण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले तर इतर डॉक्टरांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. करोना रुग्णांवर यातील बहुतांश डॉक्टर उपचार करत होते. रुग्णालय प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या डॉक्टरांमध्ये सौम्य लक्षणं होती तसंच यातील कुणीचीही प्रकृती गभीर नव्हती. दिल्लीची आकडेवारी गेल्या काही दिवसांत दिल्लीतील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून आलीय. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत एव्हाना एकून करोनाबाधितांची संख्या ९ लाख ५६ हजार ३४८ वर पोहचलीय. यातील ९१ हजार ६१८ रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर एव्हाना १३ हजार १९३ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3gzcQEu

No comments:

Post a Comment