Breaking

Saturday, April 24, 2021

पोलिस दलाची चिंता वाढली; मुंबईत पोलिसाचा करोनामुळं मृत्यू https://ift.tt/3dOsI4b

मुंबईः राज्यात करोना संसर्गाच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या आकडेवारीमुळं आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर, एकीकडे पोलिसांनाही करोनाचा फटका बसला आहे. पोलिस दलातील करोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले असून मुंबई पोलीस दलातील कर्मचारी सुभाष जाधव यांचं करोनामुळं निधन झालं आहे. दलात आत्तापर्यंत १०४ पोलिसांचा करोना विषाणूने बळी घेतला आहे करोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढला आणि पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. विनाकारण रस्त्यांवर येणाऱ्यांना नागरिकांना रोखण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून करोनाविरोधातील या लढाईमध्ये पोलिस आघाडीवर असून पोलिसांनाही करोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणत होत असल्याचं चित्र आहे. पुन्हा संसर्ग वाढत असल्याने पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. सुभाष जाधव हे मुंबईतील सर जे.जे मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरु होते. मात्र, शनिवारी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. सुभाष जाधव यांचे अवघ्या ३५ व्या वर्षी शनिवारी करोनाने निधन झाले. पोलिसांचे लसीकरण करोनाचा वेगाने वाढणारा संसर्ग पाहता मार्च २०२०मध्ये देशभरात लॉकडाउन लावण्यात आला. तेव्हापासून पोलिस करोनायोद्धा बनून स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा बजावत आहेत. कर्तव्य बजावताना हजारो पोलिस करोनाच्या विळख्यात सापडले. वर्षभरानंतर तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने पोलिसांनी लसीकरणावर भर दिला आहे. असे असले तरी बहुतांश पोलिसांचे कुटुंबीय अद्याप लशीपासून वंचित आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nnsion

No comments:

Post a Comment