म.टा. प्रतिनिधी, मुंबई माजी गृहमंत्री हे सीबीआयच्या दुसऱ्या चौकशीतून बचावले असल्याचे चित्र आहे. ही चौकशी करणारे पथक दिल्लीला रवाना झाले आहे. दोन दिवसांत अहवालदेखील सादर होण्याची शक्यता आहे. १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या माजी पोलीस आयुक्त यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. याअंतर्गत सीबीआयने निलंबित सह पोलीस निरीक्षक सचिन वाझेसह अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव कुंदन शिंदे व संजीव पलांडे यांचीही चौकशी करण्यात आली. स्वत: अनिल देशमुख यांचीही दोन दिवसआधी साडे नऊ तास चौकशी झाली. त्यानंतर देशमुख यांची पुन्हा चौकशी होईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. पण आता त्यांची या चौकशीतून काहीशी सुटका झाल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनुसार, सीबीआयचे चौकशी पथक दिल्लीला परतले आहे. देशमुख यांची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे. तसेच अन्य संबंधितांच्या चौकशीतून मिळालेली माहिती व सर्वांच्या जबाबांच्या आधारे दिल्लीतच या चौकशीचा अहवाल तयार होईल. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २० एप्रिलपर्यंत हा अहवाल सीबीआयला सादर करायचा आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3wYsJdn
No comments:
Post a Comment