Breaking

Saturday, April 17, 2021

रेल्वे पोलिसांच्या पेन्शनला करोनाची बाधा https://ift.tt/3v0oRXy

म. टा. प्रतिनिधी, मुंबई शहरात करोनाचा संसर्ग वाढत असतानाच आता निवृत्त रेल्वे पोलिसांच्या निवृत्ती वेतनालाही करोनाची बाधा झाली आहे. पडताळणी रखडल्याने अनेक पोलिसांची पेन्शन रखडली आहे. निवृत्त झाल्यानंतर मिळणारी तात्पुरती पेन्शनही आता बंद झाल्याने पोलिस कुटुंबीयांच्या अडचणीत वाढच होत आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर तातडीने सुरू होते. ही पेन्शन एका वर्षासाठी असते. एका वर्षात सेवा पुस्तिका पडताळणी, मंजुरी ही प्रक्रिया पूर्ण होऊन कायमस्वरूपी पेन्शन सुरू होणे अपेक्षित असते. २०१९ मधील शेवटचे तिमाही आणि २०२० मधील पहिल्या तिमाहीत निवृत्त झालेल्या पोलिसांची तात्पुरती पेन्शनही आता बंद झाली आहे. यामुळे करोनासारख्या स्थितीत दैनंदिन खर्च भागवताना पोलिस कुटुंबीयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियमानुसार सेवानिवृत्त होण्याच्या तीन महिने आधी सेवा पुस्तिका पडताळणी प्रक्रिया सुरू होणे आवश्यक असते. रेल्वे पोलिस आयुक्तालयाने सेवा पुस्तिका पाठवल्यानंतर महासंचालक कार्यालयाकडून त्याची पडताळणी होते. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी ती मंत्रालयात अर्थ विभागाकडे येते, असे मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यात आता दुसरा लॉकडाउन सुरू झाला आहे. यापूर्वी लागू झालेल्या राष्ट्रीय लॉकडाउनच्या वेळी अपुऱ्या मनुष्यबळामुळे काम रखडल्याचे सांगण्यात आले होते. अनलॉक काळात सर्व व्यवहार सुरू होत असताना करोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरासह राज्याला विळखा घातला. यामुळे पुन्हा एकदा मनुष्यबळावर निर्बंधासह सरकारी कार्यालये सुरू आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32lcIjA

No comments:

Post a Comment