Breaking

Thursday, April 1, 2021

सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल, काही दिवसांपूर्वी झाला होता करोना https://ift.tt/3dw1Vbg

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी सचिनला करोना व्हायरसची लागण झाली होती. रायपूर येथे झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज स्पर्धेत सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळला होता. भारताने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर मुंबईत परतल्यावर सचिनला करोनाची सौम्य लक्षणे दिसू लागली. त्यामुळे तो डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले होते. आता सचिनने डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले. सचिनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, डॉक्टरांच्या सल्ल्याने मी रुग्णालयात दाखल झालोय. लवकरच ठीक होऊन मी परत येईन. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत यासाठी मी सर्वांचे आभारी आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंपैकी सचिनसह अन्य चौघांना करोनाची लागण झाली आहे. या स्पर्धेत स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. भारताने अंतिम लढतीत श्रीलंकेचा पराभव केला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dq97pz

No comments:

Post a Comment