Breaking

Sunday, April 18, 2021

निवडणूक रॅली खूप झाल्या आता करोनावर लक्ष केंद्रीत करा, मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना सल्ला https://ift.tt/3efAvac

नवी दिल्ली : देशात अनेक राज्यांत करोना संक्रमणानं आपात्कालीन परिस्थिती निर्माण केली असताना पंतप्रधान मात्र निवडणूक रॅलींमध्ये व्यग्र आहेत, अशी घणाघाती टीका केलीय राजस्थानचे मुख्यमंत्री यांनी. सोबतच करोना संदर्भात केंद्र सरकारनं काही गंभीर चुका केल्या आहेत, त्या स्वीकार करून राज्यांच्या सहकार्यानंच केंद्रानं काम करायला हवं, असा सल्लाही गहलोत यांनी दिलाय. राज्यात करोना संक्रमणबाधित आणि मृत्यू प्रकरणांत सातत्यानं वाढ दिसून येत आहे. हा चिंतेचा विषय आहे. सुदैवानं राजस्थानची स्थिती शेजारील राज्यांपासून थोडी चांगली आहे. ऑक्सिजन पुरवठा काही प्रमाणात परिणाम होताना दिसतोय. देशाला एकत्रित येतच करोनाशी दोन हात करावे लागतील. आम्ही याची पूर्ण तयारी केलीय, असं गहलोत यांनी एका चर्चात्मक कार्यक्रमात बोलताना म्हटलंय. 'केंद्रानं चूक स्वीकार करायला हवी' मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात एक पत्रंही लिहिलंय. खूप झाल्या आता करोनावर लक्ष केंद्रीत करा. करोना परिस्थिती अक्राळविक्राळ स्वरुप धारण करतेय. या संदर्बात केंद्राकडून काही चुका झाल्या आहेत. त्यांनी आपल्या चुका स्वीकार करून राज्यांच्या सहकार्यानं काम करायला हवं, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी केंद्राला दिलाय. मला सर्वात मोठी तक्रार आहे ती आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याबद्दल... ते एक सदगृस्थ असल्याचा माझा ग्रह होता. ते खोटं बोलू शकतात हे मला माहीत होतं. आमच्याकडे दीड दिवसांचा लसपुरवठा शिल्लक होता. आम्ही केवळ केंद्राच्या हे कानावर घालण्याचा प्रयत्न केला, ही तक्रार नव्हती. यावर त्यांचं उत्तर होतं, लसीचा तुटवडा नाही तर राज्य सरकार लस खराब करत आहे, असं म्हणत गहलोत यांनी निराशा व्यक्त केली. 'बिहारमध्ये मोफत लसीकरणाची घोषणा करण्याऐवजी...' ज्या पद्धतीनं भारतभरात करोना लसीकरण मोहीम राबवणं गरजेचं होतं त्या पद्धतीनं ती राबवली गेली नाही. माझ्या मते ही केवळ आरोग्य मंत्र्यांची नाही तर भारत सरकारची चूक होती. लसीसंदर्भात केंद्र सरकारनं घोडचूक केलीय. याबद्दल केंद्रानं योग्य धोरण आखलं नाही. लसीकरणासाठी खासगी क्षेत्रालाही हाताशी घेणं गरजेचं होतं. निवडणुकीदरम्यान त्यांनी केवळ बिहारमध्ये मोफत करोना लसीची घोषणा केली त्याऐवजी सर्वांना मोफत लस पुरवण्याची घोषणा केंद्रानं करणं आवश्यक होतं. जास्तीत जास्त लोकांना लस मिळाली असती तर आज जी परिस्थिती दिसतेय ती उद्भवलीच नसती, असं मतही गहलोत यांनी व्यक्त केलंय. 'कुंभमेळ्याबद्दल वेळीच निर्णय घ्यायला हवा होता' हरिद्वारमध्ये सुरू असलेला कुंभमेळा, पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांत सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांवरही मुख्यमंत्री गहलोत यांनी भाष्य केलं. हरिद्वार कुंभ संबंधी भाजप सरकारनं योग्यवेळीच निर्णय घ्यायला हवा होता. कुंभातून जे परत घरी परततील, ते करोना फैलावतील. अनेक राज्यांनी कुंभातून परतणाऱ्यांना क्वारंटाईन करण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री यांनी करोना परिस्थितीला प्राधान्य देत सर्व राज्यांशी संवाद साधायला हवा. आपण मिळून लढलो तरच यशस्वी होऊ, असंही गहलोत यांनी म्हटलंय.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3uUML6y

No comments:

Post a Comment