अमरावती: जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 'ब्रेक द चेन' कार्यक्रमांअंतर्गत संचारबंदी व इतर निर्बंध लावले असताना देखील बाजारपेठेत दिसणाऱ्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी आजपासून जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठ दुपारी ३ वाजेपर्यंतच खुली ठेवली जाणार आहे. केवळ औषधीची दुकाने सुरू राहतील. तीन दिवसांपूर्वी लागू करण्यात आलेल्या नियमावलीनुसार जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठ सकाळी ७ ते रात्री ८ सुरू ठेवण्यात आली होती. (Restrictions In Amravati) वाचा: सतत १३ तासांपेक्षा अधिक बाजारपेठ खुली ठेवण्यात आल्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत नागरिक या-ना-त्या कारणाने घराबाहेर पडत होते. धान्य, किराणा, भाजीपाला, बेकरी उत्पादने, डेअरी प्रॉडक्टस्, आटा चक्की अशी सर्व प्रकारची दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ या वेळात उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे संचारबंदीतही मुक्त संचार अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर आता अंकुश आणण्यात आला असून, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांचे पाच तास कमी करण्यात आले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारी रात्री जाहीर केलेल्या निर्णय आज दि. १९ पासून अंमलात आणला जाणार आहे. वाचा: ३० एप्रिलपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंतच बाजारपेठ उघडी राहणार असून केवळ वैद्यकीय कारणांसाठीच नागरिकांना मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही वेळी-अवेळी रस्त्यावर यावे लागते. त्यामुळे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी पेट्रोल पंपधारकांना वगळले आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2OZupSC
No comments:
Post a Comment