Breaking

Monday, April 26, 2021

मोनिका मोरेने केली करोनावर मात; डॉक्टर म्हणाले... https://ift.tt/3ew6SS5

म.टा. विशेष प्रतिनिधी, रेल्वे अपघातामध्ये दोन्ही हात गमावलेल्या हिच्यावर काळामध्ये प्रत्यारोपणाची अतिशय अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे सुरू केली आहेत. त्यामुळे तिला करोना संसर्गापासून दूर ठेवण्याचा डॉक्टरांचे अथक प्रयत्न सुरू होते. मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये तिला करोनाची बाधा झाली. या परिस्थितीमध्येही न डगमगता मोनिका व तिच्या कुटुंबीयांनी करोनाशी दोन हात करत या संसर्गावर मात केली. मोनिकासह तिच्या आजी, आई व भावालाही करोना संसर्गाची लागण झाली होती. सकारात्मकपणे योग्यवेळी वैद्यकीय औषधोपचार सुरू केल्यामुळे करोनावर मात करणे शक्य आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. मोनिकाच्या हातांची शस्त्रक्रिया करणारे डॉ. नीलेश साताभाई यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, मोनिकाला प्रत्यारोपणानंतर अवयव शरीराने दूर लोटू नये यासाठी काही औषधे सुरू केली. त्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे करोना संसर्ग झाला तर काय करायचे ही भीती होती. दुर्देवाने ती खरी ठरली. थकवा येणे, भूक न लागणे, थोडासा ताण अशी प्राथमिक लक्षणे दिसू लागल्यानंतर तिच्या कुटुंबीयांचीही चाचणी केली. त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. मोनिकाच्या हातामध्ये पुन्हा क्षमता पुनरुज्जीवीत होत आहे. त्यामुळे तिची फिजोओथेरपी सुरू आहे. आता या थेरपीचा महत्वाचा टप्पा असल्याचे डॉ. साताभाईंनी सांगितले. वाचा: रुग्णालयातील प्रत्येकाला इतर सर्व रुग्णांप्रमाणे मोनिकाची खूप काळजी वाटत होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यातही संसर्गाचा अडसर ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे मोनिकाला घरामध्येच विलगीकरण करण्याचा सल्ला देण्यात आला. सौम्य प्रकारची औषधे, गरम पाणी पिणे, वाफ घेणे, ऑक्सिजनची पातळी तपासणे व या सर्व नोंदी वहीमध्ये लिहून डॉक्टरांशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधण्यात येत होता. योग्य ती काळजी घेतल्यामुळे लक्षणांची तीव्रता कमी झाली. ताप उतरला व तिच्या प्रकृतीमध्येही सुधारणा दिसून आली. इतर कुटुंबीयांची प्रकृती हळूहळू सुधारली. तर तुम्ही का नाही? 'कोणत्याही परिस्थितीत न घाबरता उपचार घ्यायला हवेत. करोना झाला म्हणजे सगळे संपले नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या आजाराशी दोन हात करायला हवेत', असे डॉ. साताभाई यांनी स्पष्ट केले. अनेक रुग्ण आजाराला घाबरतात. गर्भगळीत होतात. करोना संसर्गावर मात करता येते, हा विश्वास ठेवा. योग्यवेळी उपचार घ्या. डॉक्टरांचा सल्ला घेतला तर हात प्रत्यारोपणासारखी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केलेली मोनिका करोनामुक्त होऊ शकते, तर तुम्ही का नाही, असा आशावादही डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3vzFqKf

No comments:

Post a Comment