Breaking

Monday, April 5, 2021

अश्रू आणि शरीरात कणकण; आदित्यनं सांगितली करोनानंतरची अवस्था https://ift.tt/3fI1j55

मुंबई: करोना व्हायरसनं सध्या देशभरात थैमान घातलं आहे. महाराष्ट्रील करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय होत चालला आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना करोनाची लागण झाली आहे. ज्यात आलिया भट्ट, अक्षय कुमार, विकी कौशल, भूमी पेडणेकर, यांचा समावेश आहे. गायक आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता यांना करोनाची लागण झाली आहे. एवढंच नाही तर आदित्यला रुग्णालयातही भरती करण्यात आलं आहे. दरम्यान एका वेबसाइटशी बोलताना आदित्यनं करोना झाल्यानंतर त्याची काय अवस्था झाली आहे हे सांगितलं. 'स्पॉटबॉय-इ'ला दिलेल्या मुलाखतीत आदित्यनं सांगितलं की, त्याला रुग्णालयत भरती करण्यात आलं आहे. आदित्य म्हणाला, 'माझं संपूर्ण शरीर दुखत आहे. पहिल्या दिवशी तर माझ्या डोळ्यातून सतत फक्त पाणी येत होत. असं जाणवत होतं की, मी जिममध्ये तासंतास मेहनत केली आहे. आधीपासूनच मला कफ होता आणि तब्येत ठिक वाटत नव्हती. त्यामुळे आता ठिक व्हायला वेळ तर लागणारच आहे.' आदित्यसोबत त्याची पत्नी श्वेतालाही करोना झाल्याचं समोर आलं आहे. श्वेता बद्दल बोलताना आदित्य म्हणाला, 'माझी बायको सुद्धा करोना पॉझिटिव्ह आहे आणि जे मला जाणवतंय तशीच तिचीही अवस्था आहे. मला करोनाचं संक्रमण झाल्यानतर ३-४ दिवसांनी श्वेताचे रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आले. माझ्यामुळे तिलाही करोना झाला. आता आम्ही दोघंही ठिक होत आहोत आणि सुदैवाने माझे आई-बाबा यातून वाचले आहेत.' आदित्यला रुग्णालयात भरती केल्याची माहिती त्याचे वडिल उदित नारायण यांनी दिली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Pvtmu8

No comments:

Post a Comment