नवी दिल्ली : देशात करोना संकटानं धुमाकूळ घातला असतानाच राजधानी दिल्लीतही विदारक परिस्थिती दिसून येतेय. दिल्लीकरांना ऑक्सिजनसाठी मोठ्या गंभीर परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय. दररोज समोर येणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढतानाचा दिसतोय. त्यासोबत दररोज होणाऱ्या मृत्यूंच्या आकड्यातही गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय वाढ झालेली दिसून आलीय. दिल्लीत अजूनही बेडसची संख्या आणि कायम असताना सोमवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झालीय. छत्तीसगडच्या जिंदाल स्टील प्लान्टहून ऑक्सिजनचे चार मोठे कंटेनर्स घेऊन ही 'ऑक्सिजन एक्सप्रेस' दिल्लीत दाखल झालीय. उरले केवळ १२ आयसीयू बेड मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील रुग्णालयांत केवळ १२ आयसीयू बेड उपलब्ध आहेत. तर ऑक्सिजन बेडची संख्या १७२७ आहे. DRDO / ITBP कडून '' दिल्लीत सरदार पटेल कोविड सेंटरची सुरुवात करण्यात आलीय. यामध्ये ५०० ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध आहे. दिल्लीच्या छतरपूरमध्ये ''कडून राधास्वामी सत्संग व्याज आश्रमात हे नवीन कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. परंतु, या कोविड सेंटरमध्ये आयसीयूची व्यवस्था नसल्यानं गंभीर रुग्णांना इथे न येण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आलीय. उल्लेखनीय म्हणजे, ''कडून सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरचं नामकरणही सरदार पटेल कोविड सेंटर असं करण्यात आलंय. हे कोविड सेंटर विमानतळाच्या जवळ आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत एकूण २० हजार २०१ रुग्णांची भर पडलीय. तर याच २४ तसात ३८० जणांचा मृत्यू झालाय. सध्या दिल्लीत ९२ हजार ३५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दिल्लीत १० लाख ४७ हजार ९१६ जणांना करोना संक्रमणानं गाठलंय तर एकूण १४ हजार ६२८ जणांचा मृत्यू झालाय.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3aHe2Sd
No comments:
Post a Comment