नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, सोमवारी (१९ एप्रिल २०२१) रोजी एकूण २ लाख ५९ हजार १७० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याच २४ तासांत देशात १ हजार ७६१ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तर १ लाख ५४ हजार ७६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. देशात करोनामुळे होणारे मृत्यू हा चिंतेचा विषय ठरलाय. करोना संक्रमणानं अक्राळ-विक्राळ रुप धारण केलेलं असताना आरोग्य व्यवस्था मात्र अपुऱ्या पडत चाललेलं चित्रं देशात दिसून येतंय. देशातील महत्त्वाच्या शहरांत लावण्यात येणाऱ्या निर्बंधांमुळे आणि लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या स्थलांतरी मजुरांसमोर पुन्हा एकदा रोजंदारीचा प्रश्न आ वासून उभा आहे. याच दरम्यान, केंद्र सरकारकडून येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना करोनावरील लस घेता येईल, असं जाहीर करण्यात आलंय. ही देशवासियांसाठी दिलासादायक गोष्ट ठरतेय. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ५३ लाख २१ हजार ०८९ वर पोहचलीय. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा हे रुग्ण डॉक्टरांच्या निर्देशावर आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ८० हजार ५३० नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात २० लाख ३१ हजार ९७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ५३ लाख २१ हजार ०८९ एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ३१ लाख ०८ हजार ५८२ उपचार सुरू : २० लाख ३१ हजार ९७७ एकूण मृत्यू : १ लाख ८० हजार ५३० करोना लसीचे डोस दिले गेले : १२ कोटी ७१ लाख २९ हजार ११३ भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण २६ कोटी ९४ लाख १४ हजार ०३५ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील १५ लाख १९ हजार ४८६ नमुन्यांची करोना चाचणी सोमवारी करण्यात आली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3apDwUa
No comments:
Post a Comment