मुंबई: रेमडेसिविर व ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून महाविकास आघाडी व भाजपमध्ये राजकीय वाद सुरू असतानाच, आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजप नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांचा पुतण्या याला दिली गेलेली कोविड लस यासाठी कारण ठरलं आहे. 'कुठल्याही नियमात बसत नसताना तन्मय फडणवीस याला लस कशी काय दिली गेली?,' असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आहे. (Congress Targets BJP over ) वाचा: करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण सुरू असून सध्या ४५ वर्षे वयावरील नागरिकांना लस दिली जात आहे. अनेक जण लस घेतल्याचे फोटो सोशल मीडियात शेअर करत आहेत. तन्मय फडणवीस याचाही असाच एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानं नवा वाद सुरू झाला आहे. काँग्रेसनं तन्मय फडणवीसचा लसीकरणाचा फोटो शेअर करून व भाजपला घेरलं आहे. '४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का,' असा सवाल काँग्रेसनं ट्वीटच्या माध्यमातून विचारला आहे. भाजपकडं लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का? काँग्रेसनं या निमित्तानं काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. तन्मय फडणवीस ४५ वर्षांपेक्षा मोठा आहे का?, तो फ्रंटलाइन वर्कर आहे का?, तो आरोग्य कर्मचारी आहे का? आणि जर नसेल तर त्याला लस दिलीच कशी गेली?,' अशी सरबत्तीच काँग्रेसनं केली आहे. रेमडेसिविर इंजेक्शनप्रमाणे भाजपकडं लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का?,' असा खोचक टोलाही काँग्रेसनं हाणला आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3apnBoG
No comments:
Post a Comment