Breaking

Friday, April 30, 2021

करोना रुग्णांना दिलासा; विमा नियामकाचा आरोग्य विमा कंपन्यांना दणका, दिला आहे आदेश https://ift.tt/3gUOvce

नवी दिल्ली : विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. 'कोव्हीड'शी संबंधित कॅशलेस ट्रीटमेंट असलेल्या विमा दाव्यांचा एका तासात निपटारा करण्याचे आदेश विमा नियामकाने (इरडा) आरोग्य विमा कंपन्यांना दिला आहे. यामुळे कोव्हीड विमा असलेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षांपासून विमा नियमकाकडे आरोग्य विमाधारकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सध्याच्या करोनाच्या दुसऱ्या लाटेत देखील आरोग्य विमा धारकांना दावा मंजूर करण्यासाठी विमा कंपन्यांचे हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यावर इरडाने एका मोठा निर्णय घेतला आहे. कोव्हीड-१९ शी संबंधित असलेल्या कॅशलेस ट्रीटमेंटचे सर्व दावे प्राप्त झाल्यानंतर एका तासाच्या आत मंजूर करावेत, असे आदेश विमा नियामकाने दिले आहेत. विमा नियमकाने कोव्हीड-१९ हेल्थ इन्शुरन्स क्लेमसंबधी नियमावली जारी केली आहे. देशात निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा, औषधांची कमतरता आणि काळाबाजार यावरून सध्या दिल्ली उच्च न्यायालयात दररोज सुनावणी होत आहे. या सुणवणी दरम्यान विमा कंपन्यांच्या आडमुठेपणाची दखल न्यायालयाने घेतली. कोव्हीड-१९ चे कॅशलेस दावे निकाल काढण्यासाठी विमा कंपन्या वेळकाढुपणा करत आहेत . त्याचबरोबर दावे नाकारण्यासाठी शुल्लक कारणे दिले जात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनात आले. त्यानंतर न्यायालयाने तातडीने विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला कोव्हीड कॅशलेस दाव्यांसंबंधी निर्णय घेण्याचे आदेश दिले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विमा नियामकाने विमा कंपन्यांना कोव्हीड-१९ चे कॅशलेस दावे प्राप्त झाल्यानंतर ३० मिनिटे ते ६० मिनिटांच्या कालावधीत मंजूर करावे असा आदेश जारी केला. कॅशलेसचे झटपट दावे निकाली काढल्याने रुग्णांची हॉस्पिटलमधून लवकर सुटी होई आणि सध्याच्या गंभीर परिस्थितीत डिस्चार्जसाठी रखडावे लागणार नाही, असे इरडाने म्हटलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2S7TN9U

No comments:

Post a Comment