म. टा. खास प्रतिनिधी, करोना रुग्णांवर उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आणि टोसीलिझुमॅब या इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढल्याने बाजारात त्यांचा तुटवडा भासत आहे. या दोन्ही इंजेक्शनची साठेबाजी, काळाबाजार सुरू असतानाच सायबर भामटेही या संधीचा पुरेपूर गैरफायदा घेत आहेत. अनेक नामांकित फार्मा कंपनीच्या नावाने वेगवेगळ्या माध्यमातून जाहिरातबाजी करून गरजू लोकांकडून ऑनलाइन पैसे घेऊन फसविण्याच्या घटना वाढल्या आहेत. खातरजमा केल्याविना असे कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. सिप्ला फार्मा कंपनीचे डिस्ट्रिब्युटर्स असल्याचे सांगून रेमडीसीव्हीर आणि टोसीलिझुमॅब इंजेक्शनच्या जाहिराती विविध माध्यमांवर दाखविल्या जात आहेत. या जाहिरातीमध्ये दिलेल्या क्रमांकावर इंजेक्शनच्या शोधात असलेले नागरिक संपर्क करतात. या नागरिकांना इंजेक्शन पाठवतो असे सांगून त्यांच्याकडून ऑनलाइन पैसे घेतले जातात. अशा शेकडो तक्रारी येत असल्याचे सिप्ला कंपनीच्या वतीने सायबर पोलिसांना कळविण्यात आले. याची गंभीर दाखल सायबर पोलिसांनी घेतली असून अशा सायबर भामट्यांवर लक्ष ठेवले जात आहे. हे लक्षात ठेवा... सोशल मीडियावरील जाहिरातींकडे दुर्लक्ष करा. जाहिरातीमधील क्रमांकावर संपर्क करू नका. जाहिरातीमधील लिंकवर क्लिक करू नये. कोणतीही कंपनी परस्पर इंजेक्शन विक्री करत नाही. खासगी तसेच शासकीय रुग्णालयांतच इंजेक्शन पुरवली जातात. कंपन्यांच्या अधिकृत हेल्पलाइनवर संपर्क करावा. इंजेक्शनसाठी ऑनलाइन आर्थिक व्यवहार करू नये.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3eJnoy9
No comments:
Post a Comment