Breaking

Saturday, April 3, 2021

आकांक्षा पुरी- मिका सिंगने केलं लग्न? गुरुद्वारात घेतलं दर्शन https://ift.tt/3megMeD

मुंबई- टीव्ही अभिनेत्री आणि पारस छाब्राची एक्स गर्लफ्रेंड हिने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. या व्हिडीओमध्ये छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेली अभिनेत्री आकांक्षा पुरी गायक मीका सिंह याच्यासोबत दिसत आहे. हे दोघेही गुरुद्वारात बसून अरदास ऐकताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला असून, या दोघांनी लग्न केले असल्याच्या चर्चा ही सुरू झाल्या आहेत. कॅप्शनने वेधलं साऱ्यांचं लक्ष हा व्हिडीओ पाहून आकांक्षा आणि मिका यांनी लग्न केले असून गुरुद्वारात एकत्रितपणे आशीर्वाद घ्यायला गेले असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. या व्हिडीओवर आकांक्षाने 'फिलिंग ब्लेस्ट... 'असे लिहिले आहे त्यावरून ही शक्यता वर्तवली जात आहे. आकांक्षाने मागितले आशीर्वाद या व्हिडीओ शेअर करताना आकांक्षाने चाहत्यांकडून आशीर्वाद मागितले आहेत. व्हिडीओत तिने मिकाला टॅग करत हार्टचं इमोजी पोस्ट केलं आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये #yearsoftogetherness #feelingblessed #togetherforlife #bond #life #beingme #akankshapuri हे हॅशटॅगही वापरले आहेत. त्यामुळे हे दोघेजण रिलेशनमध्ये आहेत अथवा त्यांनी लग्न केले आहेत, अशी शक्यता चाहते वर्तवत आहेत. मिकानेही शेअर केला व्हिडीओ आकांक्षा सारखेच मीकानेही गुरुद्वारामधील काही व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. २०१९ मध्ये आकांक्षा पुरी हिचे नाव बिग बॉस १३ मधील स्पर्धक पारस छाबडा याच्यासोबत जोडले गेले होते. पारस जेव्हा या शोमध्ये गेला होता तेव्हापासून आकांक्षा ला डेट करत होता. परंतु कालांतराने ते वेगळे झाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/39zae59

No comments:

Post a Comment