कोलकाताः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या ( ) दुसऱ्या टप्प्यातील ३० जागांसाठी गुरुवारी मतदान झालं. या मतदानादरम्यान नंदीग्राममध्ये झालेल्या झटापटीचा ( ) उल्लेख निवडणूक आयोगाच्या अहवालात नाहीए. नंदीग्रामच्या बोयल मतदान केंद्रावर भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हाणामारी झाली होती. यामुळे या राड्यामुळे या मतदान केंद्रातच अडकून पडल्या होत्या. दोन तास हा गोंधळ सुरू होता. ममता बॅनर्जींना निम लष्करी दलाच्या जवानांनी बाहेर काढलं. निवडणूक आयोगाने निरीक्षकांना राज्यातील निवडणुकीसंबंधीचा अहवाल देण्यास सांगितलं होतं. पण आयोगाच्या अहवालात या घटनेचा उल्लेख नाही. मतदान प्रक्रियेवर कुठलाही परिणाम झालेला नाही आणि सर्व शांततेत पार पडलं, असं अहवालात म्हटलं आहे. मतदान केंद्र क्रमांक ७ वर ( बोयल मोकतब प्राथमिक शाळा) मतदान शांततेत सुरू आहे. मुख्यमंत्री ज्या या मतदारसंघाच्या उमेदवार आहेत त्या दीड तासांनी ३.३५ वाजता इथून निघून गेल्या. पण येथील मतदान प्रक्रियेवर कुठलाही परिणाम झाला नाही, असं निरीक्षकांनी अहवालात म्हटलं आहे. पोलिंग एजंटला गावाकरी आत जाऊ देत नाहीए, असा दावा तृणमूल काँग्रेसने केला. यानंतर ममता बॅनर्जी तिथे दाखल झाल्या. पण आपल्या मुलाची ड्युटी या मतदान केंद्रावर लावू नये, अशी मागणी पोलिंग एजंटच्या आईने तृणमूल नेते आणि सुरक्षा दलांकडे केली होती. आपला एककुलता एक मुलगा आहे आणि निवडणुकीनंतर आम्हाला गावात रहायचं आहे. असं झाल्यास गावात राहणं अवघड होईल, असं पोलिंग एजंटच्या आईने एका स्थानिक वृत्तवाहिनाला सांगितलं होतं. यानंतर तृणमूलने दोन व्यक्तिंची नावं दिलं. पण कागदपत्रांमधील त्रुटींमुळे सुरक्षा दलांनी त्यांना नकार दिला. ममतांना याबाबत माहिती होती की नाही हे कळलं नाही. पण ममता या दुपारी दीड वाजता या बोयल मतदान केंद्रावर पोहोचल्या. ममता मतदान केंद्रावर पोहोचताच तिथे भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. 'जय श्रीराम' आणि 'खेला होबे' च्या घोषणा दिल्या गेल्या. या राड्यामुळे ममता या मतदान केंद्राच्या बाहेर एका गल्लीत अडकून पडल्या. मग संतप्त झालेल्या ममतांनी थेट राज्यपालांना फोन केला. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याचा आरोप केला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cFkBX0
No comments:
Post a Comment