करोनाची लागण झाल्यावर काही रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याची लक्षणे जाणवतात. त्यामागची कारणे जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ छातीरोगतज्ज्ञ यांच्याशी साधलेला संवाद. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर शरीरातील कमी का होते? - करोनाचा संसर्ग झाल्यावर साधारणपणे दुसऱ्या आठवड्यात कोव्हिड न्यूमोनियाची लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे फुप्फुसाला सूज येऊन शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागते. ८०-८५ टक्के रुग्णांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे दिसत नाहीत. दहा टक्के रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसली, तरी ऑक्सिजन पातळीवर फारसा परिणाम होत नाही. मात्र, पाच टक्के रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून येते. ऑक्सिजनची पातळी नेमकी किती कमी झाल्यावर रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे? - भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक नियमांनुसार, शांत बसल्यानंतरही शरीरातील ऑक्सिजन पातळी ९४ च्या खाली असेल; तसेच काही पावले चालल्यावर रुग्णाला खूप धाप लागत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल होण्याचा विचार केला पाहिजे. घरी विलगीकरणात असलेल्या करोनाबाधित रुग्णांनी ऑक्सिजन पातळीची दैनंदिन नोंद ठेवणे का गरजेचे आहे? - करोनाचा संसर्ग झाल्यावर साधारणपणे पहिल्या आठवड्यात ताप, अंगदुखीसारखी लक्षणे जाणवतात. दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजे सातव्या, आठव्या दिवशी फुप्फुसांत कोव्हिड न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. तो वाढत नाही ना, हे तपासण्यासाठी शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीची दैनंदिन नोंद ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी बाजारात पल्स ऑक्सिमीटर उपलब्ध आहे. त्याच्या साह्याने दिवसातून तीन वेळा शरीरातील ऑक्सिजनच्या नोंदी (बेसलाइन रीडिंग) घ्याव्यात; तसेच तीन मिनिटे चालण्याचा व्यायाम करून त्यानंतरही शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण पाहावे. बेसलाइन रीडिंग आणि चालण्याचा व्यायाम केल्यावरचे रीडिंग यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. पोटावर झोपल्याने (प्रोन पोझिशनिंग) शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते का? फुप्फुसाचे आरोग्य जपण्यासाठी काय काळजी घ्यावी? - प्रोन पोझिशनिंगमुळे ऑक्सिजन वाढत असेल तरच त्याचा उपयोग असतो; पण ते 'स्टँडर्ड केअर अॅडव्हाइस' नाही. रुग्णालयात दाखल रुग्णांना अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह फिजिओथेरपी दिली जाते. पण शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य असेल किंवा कोव्हिड न्यूमोनियाची लक्षणे नसतील, अशा रुग्णांनी हे व्यायाम करण्याची गरज नाही. त्याऐवजी घरातल्या घरात किंवा विलगीकरणातील परिसरात जास्तीत जास्त चालणे, प्राणायाम, अनुलोम-विलोमसारखे श्वसनाचे व्यायाम करणे आणि मोकळ्या हवेत राहणे या सोप्या व्यायामांमुळेही फुप्फुसाचे आरोग्य जपता येईल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dPD0Ba
No comments:
Post a Comment