म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्याचे माजी गृहमंत्री यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने गुन्हा नोंदवल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री यांनी मुख्यमंत्री यांची शनिवारी वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी खंडणी गोळा करण्याचा आदेश दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात आता 'सीबीआय'ने देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. वळसे पाटील यांचा शनिवारी पुणे दौरा होता, मात्र या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दौरा रद्द केला. 'सीबीआय'ने ज्या अर्थी माजी देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, त्या अर्थी 'सीबीआय' या प्रकरणात आणखी काही पोलिस अधिकाऱ्यांची, तसेच मंत्र्यांचीही चौकशी करील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. डेलकर प्रकरणासंबंधीही चौकशी? 'खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली असली तरीदेखील त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या घटना दादरा-नगर हवेली इथे घडल्या. त्यामुळे दादरा, नगर हवेली पोलिसांनी त्यासंबंधी चौकशी करायला पाहिजे. कायदेशीर बाजू तपासल्यानंतर मी या मतावर आलो होतो. मात्र, अनिल देशमुख यांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त झाल्याचा गुन्हा मुंबईतच दाखल करण्यासाठी दबाव टाकला. डेलकर आत्महत्या प्रकरणात विधानसभेत एसआयटीची घोषणा केली,' असे परमबीरसिंह यांनी त्यांच्या पत्रात म्हटले होते. त्यामुळे या अनुषंगानेदेखील सीबीआय चौकशी करणार आहे. या सर्व मुद्यांवर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3aEJJvx
No comments:
Post a Comment