Breaking

Sunday, April 25, 2021

२४ तासांत साडे तीन लाखांहून अधिक करोनाबाधित, २८१२ जणांचा मृत्यू https://ift.tt/3njVLjb

नवी दिल्ली : देशात, रविवारी (२६ एप्रिल २०२१) रोजी एकूण ३ लाख ५२ हजार ९९१ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कालच्या २४ तासांत देशात तब्बल २ हजार ८१२ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. देशात रविवारी एकूण २ लाख १९ हजार २७२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ९५ हजार १२३ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात २८ लाख १३ हजार ६५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा हे रुग्ण डॉक्टरांच्या निर्देशावर आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. देशात आत्तापर्यंत १ कोटी ४३ लाख ०४ हजार ३८२ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत.
  • एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३
  • एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ४३ लाख ०४ हजार ३८२
  • उपचार सुरू : २८ लाख १३ हजार ६५८
  • एकूण मृत्यू : १ लाख ९५ हजार १२३
  • करोना लसीचे डोस दिले गेले : १४ कोटी १९ लाख ११ हजार २२३
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण २७ कोटी ९३ लाख २१ हजार १७७ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील १४ लाख ०२ हजार ३६७ नमुन्यांची करोना चाचणी रविवारी करण्यात आली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2PpyfEU

No comments:

Post a Comment