नवी दिल्ली : देशात एकीकडे करोना संक्रमणामुळे मंदावलेलं जनजीवन सुरळीत मार्गावर आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच पुन्हा एकदा करोना संक्रमणानं वेग घेतल्याचं दिसून येतंय. प्रशासनानं अनारक्षित रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतलाय. रेल्वे मंत्रालयाकडून नुकतीच याबद्दल सोशल मीडियावर माहिती देण्यात आलीय. रेल्वे मंत्री यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिलीय. प्रवाशांच्या परिवहन सुविधेत वाढ करण्यासाठी ५ एप्रिलपासून ७१ अनारक्षित रेल्वे सेवा सुरू केली जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. या रेल्वे प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायक प्रवास सुनिश्चित करतील, असं आश्वासनही त्यांनी याद्वारे दिलंय. रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार या अनारक्षित रेल्वेमध्ये उत्तर भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांत चालणाऱ्या रेल्वेंचा यात समावेश आहे. यामध्ये सहारनपूर - दिल्ली जंक्शन, फिरोजपूर कँट - लुधियाना, फजिल्का - लुधियाना, बठिंडा - लुधियाना, वाराणसी - प्रतापगड, सहारनपूर - नवी दिल्ली, जाखल - दिल्ली जंक्शन, गाझियाबाद - पानीपत, शाहजहाँपूर - सीतापूर, गाझियाबाद - मुरादाबाद यांसहीत अनेक शहरांसाठी या अनारक्षित रेल्वे चालणार आहेत. रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, या रेल्वेतील अधिकतर गाड्यांची सुरुवात ५ एप्रिलपासून होतेय. तर काही रेल्वे ६, १५, १६, १७ एप्रिलपासून सुरू होतील.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3meWRvS
No comments:
Post a Comment