हापूड/ मेरठ: उत्तर प्रदेशात आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. दोन्हीही घटनांमधील मुख्य आरोपी हे पीडित मुलींच्या ओळखीचे असल्याची माहिती समोर आली आहे. एका घटनेत आरोपी हा पीडित मुलीचा नातेवाइक आहे, तर दुसऱ्या घटनेत आरोपी हा पीडितेच्या सोबत शिकत आहे. हापूडच्या सिंभावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर करण्यात आला. त्यानंतर गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. या घटनेत पीडितेची वहिनी आणि तिचा भाऊ सामील असल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृताच्या वहिनीला आणि तिच्या कुटुंबीयांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे. मुख्य आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके स्थापन केली आहेत. लवकरच घटनेचा उलगडा करण्यात येईल. सिंभावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी दहावीत शिकत होती. २२ मार्च रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ती घरातून बाहेर पडली. शाळेत जायला निघाली होती. मात्र, संध्याकाळी उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. कुटुंबीयांना गुरुवारी दुपारी एक फोन कॉल आला. दोन तरूण तुमच्या मुलीला अँब्युलन्समध्ये सोडून पसार झाल्याची माहिती समोरून देण्यात आली. दुसरी घटना मेरठमध्ये घडली. सरधना हद्दीत गुरुवारी शिकवणीला जाणाऱ्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला विष पाजले. घरी कशीबशी पोहोचलेल्या मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी गावातील चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3rJy2tb
No comments:
Post a Comment