Breaking

Sunday, April 25, 2021

पेट्रोल आणि डिझेल ; जाणून घ्या आजचा इंधन दर https://ift.tt/3sTAJsN

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी इंधन दर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सलग अकराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी सलग अकराव्या दिवशी देशातील प्रमुख शहरांत पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवले आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८७.८१ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.४१ रुपये आहे. सहा दिवसांपूर्वी पेट्रोल १६ पैसे आणि डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले होते. दरम्यान, आज सकाळी सिंगापूरमध्ये कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ०.१५ डॉलरच्या घसरणीसह ६५.९६ डॉलरपर्यंत खाली आला तर डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.१० डॉलरने घसरला आणि प्रती बॅरल ६२.०४ डॉलर इतका झाला होता. देशात, रविवारी (२६ एप्रिल २०२१) रोजी एकूण ३ लाख ५४ हजार ६५३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात सध्या २८ लाख ०७ हजार ३८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कालच्या २४ तासांत देशात तब्बल २ हजार ८०८ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. देशात रविवारी एकूण २ लाख १८ हजार ६२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ७३ लाख ०६ हजार ४२० वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ९५ हजार ११८ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dVHypH

No comments:

Post a Comment