Breaking

Thursday, April 29, 2021

अडवाणींच्या नावे खोटे ट्वीट; भाजप तक्रार दाखल करणार https://ift.tt/3u5ErRF

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई माजी उपपंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्या नावाने बनावट ट्वीट करणाऱ्या संबंधितांविरुद्ध रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते यांनी गुरुवारी दिली. लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाने बुधवारी एक ट्वीट प्रसिद्ध झाले होते. मात्र ज्या हॅन्डलवरून हे ट्वीट करण्यात आले, ते अडवाणी यांचे नाही, असे प्रसारमाध्यमांना आढळून आले. त्याचबरोबर अडवाणी यांचे ट्विटरवर अकाउंटच नसल्याचा खुलासा अडवाणी यांचे स्वीय सहाय्यक दीपक चोप्रा यांनी केला. खोटे ट्वीट करून सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्यांचे भांडे फुटले आहे. या ट्वीटमागे असणाऱ्या मंडळींचा शोध घ्या व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी उपाध्ये यांनी केली. वाचा: वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3u7LFUW

No comments:

Post a Comment