भटिंडा : ''कडून देण्यात आलेल्या हाकेला साद घालत हजारो शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्ली सीमेकडे कूच केलीय. केंद्रीय सरकारनं लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर अजूनही सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात हे सर्व जण सहभागी होणार आहेत. (Thousands of farmers headed for ) एकता उग्राहणचे अध्यक्ष जोगिंदर सिंह उग्राहण यांच्या नेतृत्वाखाली या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केलीय. संघटनेचे सरचिटणीस सुखदेव सिंग कोकरी कलान यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १५ हजार शेतकऱ्यांनी टिकरी सीमेकडे कूच केलीय. टिकरी सीमेवर ठाण मांडून बसलेले हजारो शेतकरी अजूनही आपल्या मांगण्यांवर ठाम आहेत. दुसरीकडे, संयुक्त किसान मोर्चा (SKM) कडूनही कापणीच्या हंगामानंतर मोठ्या संख्येत शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर दाखल होत असल्याचं सांगण्यात आलंय. तीनही वादग्रस्त विधेयक रद्द करणं आणि किमान हमीभावाचा समावेश कायद्यात करणं या शेतकऱ्यांच्या मागण्या कायम आहेत. अनेक शेतकरी संघटना गेल्या १४६ दिवसांपासून दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर ठाण मांडून आहेत. या शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी पुन्हा देशाच्या विविध भागांतून शेतकरी सीमेवर दाखल होत आहेत. करोना संक्रमण स्थिती चिंताजनक दरम्यान, राजधानी दिल्लीत मात्र करोना संक्रमणाचा प्रश्न गंभीर बनलाय. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत एव्हाना ९ लाख ३० हजार १७९ रुग्ण आढळलेत तर तब्बल १२ हजार ८८७ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. सध्या दिल्लीत ८५ हजार ३६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3emScob
No comments:
Post a Comment