Breaking

Wednesday, April 21, 2021

LIVE : बंगालमध्ये सहाव्या टप्प्यात मतदान, सुरक्षा दलाच्या १०७१ तुकड्या तैनात https://ift.tt/3xgN7X1

कोलकाता : दरम्यान सहाव्या टप्प्यातील मतदान आज (२२ एप्रिल) पार पडतंय. सहाव्या टप्प्यात चार जिल्ह्यांतील ४३ विधानसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. पश्चिम बंगालच्या पाचही टप्प्यातील मतदाना दरम्यान हिंसक घटना घडल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगानं सहाव्या टप्प्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या १०७१ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सहाव्या टप्प्यात कोणतीही अनपेक्षित घटना टाळण्यासाठी सुरक्षेचे उपाय सुनिश्चित करण्यात आले आहेत. LIVE अपडेट - - भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांनी उत्तर २४ परगनाच्या कांचरपाडामध्ये मतदान केलं - उत्तर दिनाजपूरच्या इस्लामपूरमध्ये मतदान केंद्रावर मतदार रांग लावून आपल्या अधिकाराचा वापर करताना - पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांनी मुलगा आणि उमेदवार पवन सिंह यांच्यासोबत उत्तर २४ परगनाच्या जगतदलमध्ये मतदान केलं - सकाळी ७.०० वाजता मतदानाला सुरूवात - चार जिल्ह्यांतील ४३ विधानसभा मतदारसंघात १४ हजार ४८० मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. - या टप्प्यात एक कोटीहून अधिक मतदार ३०६ उमेदवारांच्या भविष्याचा निर्णय करणार आहेत - विधानसभा निवडणूक २०१६ मध्ये या ४३ जागांपैंकी ३२ जागांवर तृणमूल, ७ जागांवर काँग्रेस, २ जागांवर माकपा तर एका जागेवर फॉरवर्ड ब्लॉकनं विजय मिळवला होता. त्यामुळे पाऊल रोवण्यासाठी भाजपसाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरतोय. - या टप्प्यात भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय, तृणमूलचे मंत्री ज्योतिप्रिय मल्लिक आणि चंद्रिमा भट्टाचार्य, माकपा नेते तन्मय भट्टाचार्य, सिने निर्देशक राज चक्रवर्ती तसंच अभिनेत्री कौसानी मुखर्जी यांच्या भविष्याचा निकाल मतपेटीत बंद होणार आहे. - पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यांत मतदान होणार आहे


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2QGifP3

No comments:

Post a Comment